'मास्क नाही तर प्रवेश नाही', मुख्यमंत्र्यांनी गौरवलेली कोल्हापूरची मोहीम मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 06:14 PM2020-09-30T18:14:11+5:302020-09-30T18:18:59+5:30

'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम 'बेस्ट' ने मुंबईत राबविण्यास सुरु केली आहे.

'No mask, no entry', Kolhapur campaign glorified by the Chief Minister in Mumbai | 'मास्क नाही तर प्रवेश नाही', मुख्यमंत्र्यांनी गौरवलेली कोल्हापूरची मोहीम मुंबईत

'मास्क नाही तर प्रवेश नाही', मुख्यमंत्र्यांनी गौरवलेली कोल्हापूरची मोहीम मुंबईत

Next
ठळक मुद्दे'मास्क नाही तर प्रवेश नाही', कोल्हापूरची अभिनव मोहीम मुख्यमंत्र्यांनी गौरवलेली मोहीम मुंबईत

कोल्हापूर- 'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूरचेजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम 'बेस्ट' ने मुंबईत राबविण्यास सुरु केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी' मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' अशी अभिनव मोहीम सुरु केली.

यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सनिटायझर यावर भर दिल आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्यात येत आहेत.

या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत 'बेस्ट' च्या सर्व बस स्थानकावर याचे फलक लावण्यात आले आहेत.

Web Title: 'No mask, no entry', Kolhapur campaign glorified by the Chief Minister in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.