नोकऱ्यांसाठी वशिल्याची नाही गरज-: पूर्ण परीक्षा अंॉनलाईन, प्रक्रिया पारदर्शक, मुलाखतीला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:05 AM2019-03-16T01:05:55+5:302019-03-16T01:06:21+5:30
राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती समजून घेऊन कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याची गरज आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३ मार्च रोजी एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदांना रिक्त जागांची जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाहिराती प्रसिद्धही झाल्या. मात्र त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि काही जिल्ह्यामध्ये ‘दलाल’ सक्रिय झाले असून, त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे. वास्तविक जाहिराती याआधी आल्या असल्या तरी २६ मार्चच्या रात्री १० नंतर आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीचे पोर्टल खुले होणार आहे. १६ एप्रिल २०१९ च्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.
समान गुण मिळाले तर...
वय आणि पदवी समान असेल तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला प्राधान्य दिले जाईल.
वय समान असेल तर उच्चतम शैक्षणिक पात्रता असणाºयाला प्राधान्य.
वय, पदवी समान असेल तर किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये सर्वाधिक गुण असणाºयास प्राधान्य.
कुणाला कितीही जागांसाठी कुठल्याही जिल्हा परिषदेला अर्ज करता येतो.
त्या त्या जिल्ह्यातील इंटरनेटची सुविधा असणाºया संगणकांची उपलब्ध संख्या पाहून एकूण चार ते पाच महिन्यांत ही नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर माहिती घ्यावी लागणार आहे.
ही परीक्षा २०० गुणांसाठी होईल.
हे प्रश्न बहुपर्यायी राहणार आहेत.
प्रश्न सोडविण्यासाठी दीड तास वेळ असेल.
तांत्रिक पदांसाठी ४० गुणांचे प्रश्न त्या विषयावरील असतील.
सर्वसाधारणपणे इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान आणि बुद्धिमापन या विषयासाठी प्रत्येकी १५ प्रश्न असतील.
एका प्रश्नाला दोन गुण असतील.
गुणांना उत्तीर्ण
ज्या उमेदवाराला २०० पैकी ९० गुण म्हणजे ४५ टक्के गुण मिळतील तो उत्तीर्ण समजला जाईल. यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी जिल्हा परिषदांकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल. त्यानंतर संबंधितांना नेमणूक पत्र दिले जाईल. ही निवड यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरली जाईल.
वयाची मर्यादा
38
खुल्या प्रवर्गासाठी
43
मागासवर्गीयांसाठी
45
अपंग, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांसाठी
43
खेळाडूंसाठी
38
अनाथांसाठी
43
आर्थिकदृष्ट्या मागास (१० टक्के आरक्षणासाठी)
ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याने कुणीही, कितीही सांगितले तरीही यामध्ये वशिला चालणार नाही. एकाच वर्गात पेपर सोडविताना प्रत्येकाला वेगळा पेपर जाणार आहे. त्यामुळे कुणालाही पैसे देऊन उमेदवारांनी फसवणूक करून घेऊ नये.
- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर