kdcc bank : मागणीच नाही तर अध्यक्षपद बदलणार कसे?, मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:50 AM2022-01-22T11:50:18+5:302022-01-22T11:50:49+5:30
उपाध्यक्ष पद वर्षाला बदलण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची दिली माहिती
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाबाबत कोणीही मागणी केली नव्हती, त्यामुळे दोन वर्षांचा प्रश्नच येत नाही. उपाध्यक्ष पद वर्षाला बदलण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ व उपाध्यक्षपदी राजू आवळे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पद दोन वर्षांनी बदलण्याबाबत मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता, ते म्हणाले की, मुळात अध्यक्ष पदाची कोणीच मागणी केली नव्हती. त्यामुळे दोन वर्ष मुदतीचा प्रश्न येत नाही. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत केवळ उपाध्यक्ष पदाबाबत चर्चा झाली. या पदावर वर्षाला संधी देण्यावर चर्चा झाली.
‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामाेर्तब
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर ‘पाच वर्षे मुश्रीफच अध्यक्ष’ असे ‘लोकमत’ ने वृत्त दिले होते. या वृत्तावरच शुक्रवारी मंत्री मुश्रीफ यांनी शिक्कामोर्तब केले.