लॉकडाऊनमध्ये कोणाची गय केली जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:35+5:302021-05-16T04:23:35+5:30

इचलकरंजी : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी १६ ते २३ मे पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचे ...

No one will be spared in the lockdown | लॉकडाऊनमध्ये कोणाची गय केली जाणार नाही

लॉकडाऊनमध्ये कोणाची गय केली जाणार नाही

googlenewsNext

इचलकरंजी : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी १६ ते २३ मे पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात आदेशानुसार लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केवळ औषध दुकान व वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे. दूध व भाजीपाला यांना ठराविक वेळेत फिरून विकण्यास परवानगी देण्यात आली, असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली.

शहर व परिसराच्या हद्दीत येणाऱ्या तिन्ही पोलिस ठाण्यास नियमांची काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरात तीन ठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. मास्क, पीपीई व सॅनिटायझरची निर्मिती करण्याची नोंद ठेवली जाणार असून त्यांना मॅन्युअल पास दिले जाणार आहेत.

तसेच सकाळी सहा ते दहा व दुपारी चार ते सात वाजेपर्यंत दूध, भाजीपाला फिरून विकण्यास परवानगी दिली आहे. अन्य वेळेत किंवा बसून विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती व आक्षेपार्ह संदेश व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

यावेळी पोलिस अधिकारी गजेंद्र लोहार, श्रीकांत पिंगळे, एस. एस. यादव उपस्थित होते.

प्रशासनाकडून पथके तैनात

मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी पाच कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक, तर आस्थापना व भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाईसाठी नगरपालिकेमार्फत तीन पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच १२ पोलिस अधिकारी व १०० कर्मचाऱ्यांसह होमगार्ड चोवीस तास तैनात असणार आहेत.

शिवभोजन व अन्नछत्र सेवा घरपोच सुरू

शहरातील गरीब, गरजू लोकांसाठी शासनाने शिवभोजन व सामाजिक संस्थांकडून अन्नछत्र सुरू केले आहे. परंतु लॉकडाऊन काळात ते बंद राहणार आहे. केवळ घरपोच सुविधा देण्यात येणार आहे.

Web Title: No one will be spared in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.