दुकाने, व्यवसाय बंद करण्यासाठी दबावतंत्र नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 06:14 PM2021-03-31T18:14:30+5:302021-03-31T18:16:21+5:30
BJP collector kolhapur - राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. अशा पध्दतीने दबाव टाकणे योग्य नाही. तसेच संभाव्य जे लॉकडाऊन होणार आहे त्यालाही आमचा विरोध असल्याचे निवेदन बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
कोल्हापूर : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. अशा पध्दतीने दबाव टाकणे योग्य नाही. तसेच संभाव्य जे लॉकडाऊन होणार आहे त्यालाही आमचा विरोध असल्याचे निवेदन बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. व्यवसायाची वेळ वाढवून देण्याबाबत आपण प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देसाई यांची भेट घेतली आणि चर्चा केली. दुपारी प्रचंड ऊन असताना सर्व सामान्य नागरिक स्वत:च्या घरासाठी लागणारी खरेदी करण्यासाठी संध्याकाळीच बाहेर पडतात परंतु रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. यातून समाजातील सर्वच घटकात असंतोष वाढत चालला आहे. याची दखल घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विक्रम राठोड, कालिदास बोरकर, नजीर देसाई, अशोक लोहार, गायत्री राऊत, अप्पा लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्यावतीने महेश जाधव आणि राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना लॉकडाऊनच्या विरोधामध्ये निवेदन दिले.