सार्वजनिक नमाज पठण नाही-जिल्हाधिकारी दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 PM2021-05-12T16:40:43+5:302021-05-12T16:47:20+5:30
CoronaVirus Kolhapur : मुस्लीम बांधवांनी कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या रुग्णांचा विचार करता रमजान ईद साधेपणाने साजरी करावी. नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळया जागेत एकत्र येऊ नये अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.
कोल्हापूर : मुस्लीम बांधवांनी कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या रुग्णांचा विचार करता रमजान ईद साधेपणाने साजरी करावी. नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळया जागेत एकत्र येऊ नये अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.
मुस्लीम बांधवांची रमजान ईद गुरुवार किंवा शुक्रवारी ी(चंद्रदशर्नावर अवलंबून) साजरी होत आहे. यानिमित्त सामान खरेदीसाठी दिलेल्या वेळेव्यतिरिक्त अन्य वेळेत नागरिकांनी गर्दी करु नये. यासह मिरवणूका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.