रिप्लेक्टर नाही तर ऊस अड्डयात प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:28+5:302021-02-07T04:22:28+5:30
रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना दालमिया कंपनी आणि पन्हाळा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रिप्लेकटर पट्टी आणि कापड ...
रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना दालमिया कंपनी आणि पन्हाळा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रिप्लेकटर पट्टी आणि कापड वाटप करण्यात आले. ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्यावेळी दिसत नसल्याने अपघात होतात. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अपघात टाळण्यासाठी रिप्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. तसेच वाहनधारकांनी वाहन चालविताना रस्ते वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक फडतारे आणि जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी यांनी दिला.
यावेळी वरिष्ठ मॅनेजर (केन) संग्राम पाटील, सुरक्षा विभागप्रमुख विक्रम सिंग, पोलीस काॅन्स्टेबल बाजीराव चौगुले, वकील अवधूत कोकाटे, आर. के. संकपाळ, सुरेश चेचर, आदींसह ट्रॅक्टर, ट्रक वाहन चालक, बैलगाडीवान उपस्थित होते.
०६ आसुर्ले पोर्ले दालमिया शुगर
आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) दत्त (दालमिया) साखर कारखान्याच्या ऊस अड्डयातील वाहनांना रिप्लेक्टर लावताना पन्हाळा पोलीस निरीक्षक अमरिश फडतारे, बाजीराव चौगुले, डावीकडून विक्रम सिंग, संग्राम पाटील, अवधूत कोकोटे.