हेरलेत कोणताही समाज विकासकामापासून वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:14+5:302021-08-12T04:28:14+5:30

हेरले (ता. हातकणंगले) येथे डॉ. आण्णाभाऊ साठे युवक संघटना व मातंग समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार ...

No society in Herle will be deprived of development work | हेरलेत कोणताही समाज विकासकामापासून वंचित राहणार नाही

हेरलेत कोणताही समाज विकासकामापासून वंचित राहणार नाही

Next

हेरले (ता. हातकणंगले) येथे डॉ. आण्णाभाऊ साठे युवक संघटना व मातंग समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार फंडातून १० लाख रुपयांच्या सांस्कृतिक हॉलच्या पायाखुदाई शुभारंभप्रसंगी बोलत होते.

यावेळी कोविड योद्धयांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राजू बाबा आवळे म्हणाले, रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी विकासकामाचा डोंगर उभा केला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

यावेळी माजी सभापती राजेश पाटील, डॉ. पद्माराणी पाटील, मुनीर जमादार, डॉ. राहुल देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच संदीप चौगुले, ग्रा.पं. सदस्य मज्जीद लोखंडे, दादासो कोळेकर, डेव्हिड लोखंडे, विनोद वडड, सयाजी गायकवाड, राहुल लोखंडे, समीर नायकवडी, सूरज लोखंडे, बाळासो लोखंडे, गोविंद आवळे, प्रथमेश लोखंडे, धीरज लोखंडे, सुंदर लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार डेव्हिड लोखंडे यांनी मानले.

हेरले (ता. हातकणंगले) येथे मातंग समाज सांस्कृतिक हॉलचे पायाखुदाई करत असताना आमदार राजू बाबा आवळे. यावेळी माजी सभापती राजेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: No society in Herle will be deprived of development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.