ऊसदर आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेल करू नये --धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:15 AM2019-05-25T10:15:38+5:302019-05-25T10:19:34+5:30

आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ह्यएफआरपीह्णचा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच

Nobody should blackmail on the agitation - Vigorous thinking | ऊसदर आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेल करू नये --धैर्यशील माने

ऊसदर आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेल करू नये --धैर्यशील माने

Next
ठळक मुद्देशेट्टींना वायफळ आत्मविश्वास नडलाजातिपातीचे राजकारण झाले असते तर मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला जनतेने खासदार केले नसते.शेतकरी संघटनेशी शत्रुत्व नाही

कोल्हापूर : आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ह्यएफआरपीह्णचा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच लागणार आहे. कोण जर थकवत असेल तर त्यांना थकविण्याचे काम येथून पुढे केले जाईल. या संदर्भात शासनदरबारी कठोर भूमिका घ्यावी लागली तर घेणार; पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारच, असा विश्वास हातकणंगलेचे नवनियुक्त खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांबरोबरच इचलकरंजीतील टेक्साईल, डोंगरवाड्या-वस्त्यांवरील तरुणांना रोजगार, शेतीमाल प्रक्रिया केंद्र आणि आष्ट्यात एमआयडीसीसह पंचगंगा नदी शुद्ध करणे ही कामे सध्या मी अजेंड्यावर घेतली असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी टीमवर्कने काम करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना पराभूत करून पहिल्यांदाच खासदार झालेले धैर्यशील माने यांनी शुक्रवारी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळण्यापासून ते विजयी होईपर्यंतच्या वाटचालीवर भाष्य करताना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चुकांवरही अचूकपणे बोट ठेवले. देशपातळीवरील नेतृत्वाचे वेध लागलेल्या शेट्टींना मतदारसंघातील प्रश्न मात्र दिसले नाहीत. केवळ उसाचे आंदोलन केले की मतदारसंघाचा विकास होत नसतो. त्यासाठी अष्टपैलू नेतृत्व हवे.

शेतीबरोबरच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नागरी प्रश्न आहेत. याकडे त्यांनी कधी पाहिलेच नाही. ते स्थानिक पातळीवरील वास्तवापासून ते लांबच राहिले. हाताला रोजगार देण्याची गरज असताना त्यांनी आंदोलने करायला लावली. मोदींनी माझ्याविरोधात रिंगणात उतरवून दाखवावे, असे आव्हान ते देत राहिले. त्यांना हाच वायफळ आत्मविश्वास नडला. कै. खासदार बाळासाहेब माने यांना मानणारा गट आणि शिवसेना भाजपच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर सकारात्मक विचारधारा घेऊन मी निवडणूक लढविली आणि जिंकली आहे. आता मतदारसंघात तरुणाईच्या नव्या विकासपर्वाला प्रारंभ होत आहे.

उद्धव ठाकरे रत्नपारखी
बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे शब्द पाळणारे एकमेव नेते आहेत. पक्षप्रवेशावेळी उमेदवारीचा दिलेला शब्द त्यांनी तंतोतंत पाळला. माझ्यातील स्पार्क ओळखण्याचे काम त्यांनी केले. ते खऱ्याअर्थाने रत्नपारखी आहेत. मी त्यांना दिल्लीत भगवा नेण्याचा शब्द दिला होता, तो शब्द मीही पाळला आहे. आता मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे. याउलट ज्या पवारांच्या पक्षात माने गटाने २० वर्षे घालवली, त्या पवारांना माझ्यातील स्पार्क दिसला नाही, याचे वाईट वाटते. मी घराणेशाही म्हणून उमेदवारी मागत नव्हतो. माझ्यात ती क्षमता होती; पण पवारांना ते दिसले नाही, त्यांना आपल्या नातवामध्ये असा कुठला स्पार्क दिसला, हे माहीत नाही.

शेतकरी संघटनेशी शत्रुत्व नाही
शेतकरी संघटना काही माझी शत्रू नाही, ती स्पर्धक होती. आता स्पर्धा संपली आहे. आता येथून पुढे सर्वजण एकत्रितपणे मतदारसंघातील प्रश्न सोडवू. मी शेती असणारे आणि नसणारे अशा दोन्हींचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा वारसा सांगणाºया कोल्हापूर जिल्ह्याचा सर्व गट-तट, राजकारण विसरून एकदिलाने विकास करू.

पंचगंगा प्रदूषणाचा विषय प्राधान्याने हाती घेणार
माझ्या मतदारसंघातील शिरोली, नृसिंहवाडी या गावांपर्यंत पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. या संदर्भात मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असल्यापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. तीन महिन्यांपूर्वी पंचगंगेची परिक्रमाही पूर्ण केली आहे. हा मतदारसंघातील जनतेच्या जगण्यामरण्याचा प्रश्न असल्याने त्याला प्राधान्याने हात घालणार आहे. केंद्र आणि राज्य या दोन्हींच्या पातळीवर हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे, प्रदूषणाचा अहवाल केंद्रापर्यंत गेला आहे. याचा पाठपुरावा करून पूर्ण पंचगंगा शुद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

वारणा योजना प्रश्न सामंजस्याने सोडवणार
इचलकरंजीला पिण्याचे पाणी देण्यासाठी वारणा योजना तातडीने करणे गरजेचे आहे. हा प्रश्न ग्रामीण आणि शहरी जनतेतील गैरसमजामुळे क्लिष्ट झाला आहे. या दोन्ही घटकांमध्ये सामंजस्य घडविण्यावर माझा भर राहणार आहे.

मराठा आरक्षणावर संसदेत आवाज उठवणार
मराठा आरक्षणावर मी कायमच भूमिका घेतली आहे. केंद्र व राज्य सरकारकडे मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे; येथून पुढे त्याच्या सवलती मिळाव्यात यासाठी संसदेत आवाज उठविणार आहे. धनगर आरक्षणाच्याबाबतीतही माझी हीच भूमिका राहणार आहे.
------------------------------------------
जातिपातीचे राजकारण झाले असते तर मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला जनतेने खासदार केले नसते. जातिधर्माचे राजकारण केले असे ते म्हणत असतील तर तो आतापर्यंत त्यांना मतदान केलेल्यांचा अपमान आहे. मी बहुजन म्हणूनच रिंगणात उतरलो, मी कधीही जातीचा उल्लेख केला नाही.
 

Web Title: Nobody should blackmail on the agitation - Vigorous thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.