‘अनाहूत’ लघुपटाचे फिल्मफेअरसाठी नामांकन : बगाडे, मतदानाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 07:21 PM2017-12-21T19:21:57+5:302017-12-21T19:32:50+5:30
चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापूरमधील कलाकार आणि तंत्रज्ञांनी बनविलेल्या ‘अनाहूत’ या लघुपटाचे फिल्म जगतातील नामांकित फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन झाले आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळणारा हा कोल्हापूरचा पहिलाच लघुपट असल्याची माहिती दिग्दर्शक उमेश बगाडे यांनी गुरुवारी दिली.
कोल्हापूर : चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापूरमधील कलाकार आणि तंत्रज्ञांनी बनविलेल्या ‘अनाहूत’ या लघुपटाचे फिल्म जगतातील नामांकित फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन झाले आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळणारा हा कोल्हापूरचा पहिलाच लघुपट असल्याची माहिती दिग्दर्शक उमेश बगाडे यांनी गुरुवारी दिली.
ते म्हणाले, आमच्या अॅडव्हेंचर्स निर्मिती संस्थेचा हा सहावा लघुपट आहे. गतवर्षी ‘चौकट’ या लघुपटाचे कान्स, इटलीतील लोकप्रिय चित्रपट महोत्सवात कौतुक झाले. दोन महिन्यांपूर्वी बनविलेल्या ‘अनाहूत’ लघुपटालाही सोशल मीडियावर भरपूर लाईक मिळत आहेत.
फिल्मफेअर साठी १९०० लघुपट आले होते. त्यापैकी केवळ ५७ लघुपट अंतिम फेरीत पोहोचले असून त्यात अनाहूतचा समावेश आहे. फिल्मफेअर व्यवस्थापनाने अन्य पुरस्कार स्पर्धेबरोबरच पिपल्स चॉईस स्पर्धेसाठी या लघुपटाची निवड केली आहे. त्यामुळे जास्ती जास्त लोकांनी लिंकद्वारे लघुपटासाठी मतदान करावे.
समिधा गुरू म्हणाल्या, ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कधी बोललं जातं नाही. असा विषय घेऊन हा लघुपट बनविण्यात आला आहे. समाजाची गरज लक्षात घेऊन एक चांगला विषय हाताळला आहे. जास्तीत जास्त लोकांनी हा लघुपट बघून लघुपटाला मतदान करावे.
छायाचित्रण प्रमुख अभिषेक शेटे म्हणाले, वास्तववादी विषय हा मनाला भिडणारा आहे हे यश आहे आमचं हा अभिमानाचा भाग आहे. पत्रकार परिषदेस रचना जगदाळे, संदीप गावडे, धनंजय पाटील, विजय कुलकर्णी,अमर कांबळे, सौरभ प्रभुदेसाई उपस्थित होते.