विनाअनुदानित शाळा कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:50 PM2019-08-26T16:50:22+5:302019-08-26T16:56:54+5:30
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह मोर्चा काढण्यात आल्या. ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन केले जाईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने प्रशासनास दिला. आपल्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह मोर्चा काढण्यात आल्या. ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन केले जाईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने प्रशासनास दिला. आपल्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
विनाअनुदानित शाळा कृती समितीवतीने दि. ५ आॅगस्टपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाने या मागण्यांबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याने शिक्षकांचे उपोषण गेली आठ दिवसापासून सुरू झाले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलन करण्यात आले. तरही प्रशासन दखल घेत नसल्याने कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दसरा चौक येथून सोमवारी कोल्हापूर विभागातील सर्व ४५० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढाला. मोर्चा अग्रभागी माहात्मा गांधी, राजमाता जिजाऊ, ताराराणी यांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थी - विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.