उत्तूरचे कोविड केअर सेंटर जीवनदायी ठरेल : नवीद मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:13+5:302021-05-29T04:20:13+5:30
अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी होते. यावेळी फाउंडेशनमार्फत पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स नवीद मुश्रीफ यांच्या ...
अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी होते. यावेळी फाउंडेशनमार्फत पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आले.
नवीद मुश्रीफ म्हणाले, गेली १५ वर्षे मुश्रीफ फाउंडेशनची सामाजिक भान ठेवून विधायक कामे सुरू आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक आहे. जवळची माणसं हिरावली जात आहेत. या कोविड सेंटरमधून चांगली सेवा मिळेल. तिसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रांताधिकारी डॉ. खिलारी म्हणाले, कोविड सेंटरमध्ये तुमच्या विश्वासावर रुग्ण येतात. त्यांना चांगली सेवा देणे गरजेचे आहे. उत्तूरला दुसरे कोविड सेंटर प्रेरणादायी ठरेल. सर्वांनीच काळजी घेणे काळाची गरज बनली आहे.
यावेळी सरपंच वैशाली आपटे, पं. स. सदस्य शिरीष देसाई, वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, मारुती घोरपडे, दीपक देसाई, संभाजी तांबेकर, गणपती सांगले, चंद्रकांत गोरुले, सुरेश खोत, बी.टी. जाधव, पी. डी. भाकरे, बबन पाटील, आर.बी. चव्हाण, राजेंद्र चव्हाण, विठ्ठल उत्तूरकर, सुनील रावण, मिलिंद कोळेकर, सुधीर सावंत, नायब तहसीलदार डी.डी. कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनावणे, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ. पोलीस निरीक्षक बालाजी भांगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी......
उत्तूर, ता. आजरा. येथील नव कृष्णा व्हॅली ज्युनिअर कॉलेज येथे कोविड सेंटरचे उद्घाटन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या सेंटरला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप करताना नवीद मुश्रीफ, सरपंच सौ. वैशाली आपटे, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, शिरीष देसाई, दीपक देसाई व प्रमुख मान्यवर.