अन्न भेसळ नव्हे स्लो पॉयझनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2017 12:11 AM2017-03-26T00:11:32+5:302017-03-26T00:11:32+5:30
तरुणपणातच जडते अर्धशिषी अन् अनेक आजार
आमचा काळच वेगळा होता, भाजी-भाकरी खायचो; पण आजारी पडत नव्हतो...’ हे जेव्हा वडीलधारी सांगतात त्यावर ‘हायब्रिड’चा जमाना आहे. हे उत्तर मिळतं. रासायनिकदृष्ट्या पिकवलेले फळे, कडधान्यांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच अन्न भेसळ हे भलतंच डोकं वर काढत आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे ‘स्लो पॉयझनिंग’सारखे काम करत आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला तरुणपणाच नको ते आजार जडत आहेत.
एकेकाळी काटा मारणे म्हणजे, ‘मापात पाप’ समजले जात होते; पण अलीकडच्या काही दशकांपासून जास्त पैसा कमविण्याच्या हव्यासापायी अनेक व्यापारी फळांवर रासायनिक प्रक्रिया करतात. दैनंदिन आहारातील अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे. यातून तान्हुल्यांना दिले जाणारे दूधही सुटलेले नाही. गेल्यावर्षी मॅगीतील भेसळ हे प्रकरण खूपच गाजलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने भेसळीचा शरीरावर होणारा परिणाम सर्वसामान्यांमध्ये चर्चेला गेला.
अन्न पदार्थांचे वजन वाढविण्यासाठी सर्वसाधारणपणे खडे, माती, पाला, झाडांच्या काड्यांचा वापर केला जातो. काही वेळेस दुधाची घनता वाढविण्यासाठी तेल, युरियासारख्या पदार्थांचाही वापर केला जातो.
भेसळयुक्त पदार्थ शरीरावर संथगतीने परिणाम करतात. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्यास लवकरच दमा, डोकेदुखी, मधुमेह, शरीरावर व्रण उमटणे, अॅलर्जी यासारखे आजार जडत आहेत. त्यामुळे चार जिने चढून गेले तरी धाप लागणे, हातपाय थरथरणे, शरीरातील आंतरअवयव निकामी होण्याचेही धोके वाढत आहेत.
सर्वच प्रकारचे जंकफूड हे चवीला चटपटीत लागलात. त्यामुळे नेहमीच्या जेवणापेक्षा या पदार्थांसाठी हट्ट धरला जातो. लहान मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी ते आपणच आणून देतो. मात्र, शरीराला गरज नसलेले पदार्थ खाण्यात आल्याने वजन वाढण्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
फळांचे इंजेक्शनचा धोका
अनेकदा फळांना इंजेक्शन दिले
जाते. त्यामुळे शरीरावर
विपरीत परिणाम
होण्याचा धोका
असतो.
जगदीश कोष्टी