फोनवर नव्हे, आता बेबसाईटवर सट्टा !,सामने दुबईत, सट्टा कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:14 PM2020-10-21T12:14:07+5:302020-10-21T12:22:19+5:30

IPL , Satta Bazar, police, kolhapurnews आयपीएलचे क्रिकेट सामने दुबईत, पण सट्टा पश्चिम महाराष्ट्रात अशी अवस्था निर्माण झाली आहे. क्रिकेट सामन्यावरील सत्रावर सध्या कोल्हापूर, सांगलीमध्ये सट्टाबाजार जोमात सुरू आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी बुकींनी पूर्वीची फोनवर बुकिंगची पद्धत बदलून आता वेबसाईटवर सट्टा लावण्यासाठी ग्राहकांना मोकळे रान करून दिल्याची माहिती पुढे आली.

Not on the phone, now bet on the website !, matches in Dubai, bet in Kolhapur | फोनवर नव्हे, आता बेबसाईटवर सट्टा !,सामने दुबईत, सट्टा कोल्हापुरात

फोनवर नव्हे, आता बेबसाईटवर सट्टा !,सामने दुबईत, सट्टा कोल्हापुरात

Next
ठळक मुद्दे फोनवर नव्हे, आता बेबसाईटवर सट्टा !,सामने दुबईत, सट्टा कोल्हापुरातपोलिसांना चकवा देण्यासाठी बुकींची नवी पद्धत

तानाजी पोवार


कोल्हापूर : आयपीएलचे क्रिकेट सामने दुबईत, पण सट्टा पश्चिम महाराष्ट्रात अशी अवस्था निर्माण झाली आहे. क्रिकेट सामन्यावरील सत्रावर सध्या कोल्हापूर, सांगलीमध्ये सट्टाबाजार जोमात सुरू आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी बुकींनी पूर्वीची फोनवर बुकिंगची पद्धत बदलून आता वेबसाईटवर सट्टा लावण्यासाठी ग्राहकांना मोकळे रान करून दिल्याची माहिती पुढे आली.

क्रिकेट सामने म्हटले की विशेषत: सट्टाबाजार जोमात असतो. सध्या दुबईत आयपीएल सामने सुरू असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सट्टाबाजारात बुकींना उधाण आले. कोल्हापूर शहर व गांधीनगर येथे बुकी मोठ्या प्रमाणात निर्माण झाले.

दुबईत क्रिकेट सामने सुरू असले तरीही कोल्हापुरात करोडो रुपयांचा सट्टाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. कोल्हापुरात तनवाणी हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सट्टाबाजारावर पुन्हा प्रकाश पडला. क्रिकेट सामन्यातील पाच ते सहा सत्रांवर अगर ओव्हर, स्कोअरवर हे बेटिंग घेतले जाते. या सट्टाबाजारात १० टक्के कमिशनवर बुकी काम करीत आहेत.

पूर्वी फोनवर बेटिंग घेतले जात होते. आता पोलिसांना चकवा देण्यासाठी बुकींनी आपली पद्धत बदलली. वेबसाईटवर डिझाईन करून व प्रत्येक ग्राहकाला युजर आयडी व पासवर्ड देऊन सट्टा लावण्याची सोय केली आहे. ग्राहक घरबसल्या वेबबाईटवर सट्टा लावू लावतात. सेंटरवर पोलिसांचा छापा पडल्यास बुकीचालक एक क्लिक करून सर्व माहितीही डिलिट करतात.

गांधीनगरात रॉबिन, दुधाळीत एनओ, तर मंगळवार पेठेत डीएम

सट्टाबाजारात कमिशनवर मोठा फायदा होत असल्याने बुकींचीही संख्या वाढली. पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर व गांधीनगर भागात अवघे सात ते आठ बुकीचालक होते. आता ही संख्या १०० वर पोहोचली. प्रत्येक बुकी हा कोडवर्ड नावाने प्रसिद्ध आहे. गांधीनगरात रॉबिन, शिवन, बबलू तसेच कोल्हापुरात मंगळवार पेठेतील संतोष व एमडी दोघे पार्टनर, दुधाळी परिसरात एनओ तर शाहूपुरीत विल्सन हे बुकीचालक आहेत.

मुंबईत गॉडफादर

कोल्हापूरच्या परिसरात बुकींची संख्या मोठी असली तरीही प्रत्येक बुकी आपल्या कुवतीप्रमाणे सट्टा स्वीकारतो. या सर्वांचा गॉडफादर मुंबईत बसून सर्व व्यवहार पाहत असल्याचे समजते.

Web Title: Not on the phone, now bet on the website !, matches in Dubai, bet in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.