मविआसोबत जाण्याचा विचार नाही, राजू शेट्टी स्पष्टच बोलले; उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 09:40 AM2024-01-03T09:40:02+5:302024-01-03T09:40:25+5:30
काेल्हापूरमधील वेदगंगा नदीवरील पाटगाव धरणातून २१०० कोटींच्या वीजप्रकल्पासाठी सिंधुदुर्गात वळवण्याला विरोध करण्यास ठाकरे यांची साथ मिळावी, यासाठी भेट घेतल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा रंगली असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चा रंगल्या. कोल्हापूरमधील जागेसाठी ही भेट झाल्याचे तर्कवितर्क केले. मात्र खुद्द शेट्टी यांनी ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले.
काेल्हापूरमधील वेदगंगा नदीवरील पाटगाव धरणातून २१०० कोटींच्या वीजप्रकल्पासाठी सिंधुदुर्गात वळवण्याला विरोध करण्यास ठाकरे यांची साथ मिळावी, यासाठी भेट घेतल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
मविआसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक भूमिका घेतल्याने मविआ सोडली आहे. यावर स्पष्टीकरण येत नाही तोवर मविआसोबत जात नाही. स्वतंत्रपणाने सहा ठिकाणी निवडणूक लढणार आहोत, असेही ते म्हणाले.