भाडेवाढ नको, मीटर फेरफार करणाऱ्यांना सूचना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:04+5:302021-09-02T04:53:04+5:30

कोल्हापूर : अगोदरच डबघाईस आलेला रिक्षा व्यवसाय टिकविण्यासाठी आणखी भाडेवाढ करु नका, त्यापेक्षा मीटर फेरफार करणाऱ्यांना आवश्यक सूचना द्या. ...

Not raising fares, notify meter changers | भाडेवाढ नको, मीटर फेरफार करणाऱ्यांना सूचना द्या

भाडेवाढ नको, मीटर फेरफार करणाऱ्यांना सूचना द्या

Next

कोल्हापूर : अगोदरच डबघाईस आलेला रिक्षा व्यवसाय टिकविण्यासाठी आणखी भाडेवाढ करु नका, त्यापेक्षा मीटर फेरफार करणाऱ्यांना आवश्यक सूचना द्या. अशी मागणी जिल्हा रिक्षा एकीकरण संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. मागणीचे निवेदन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना दिले.

रिक्षा नवे भाडे दरवाढ प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे दि. १ मे रोजी घोषित केली. त्यात प्रारंभीच्या कि.मी. साठी २२ व त्यापुढील कि.मी. करिता १८ रुपये दर जाहीर झाले आहेत. त्याचे सर्वसामान्य रिक्षा चालकांतून स्वागत केले जात आहे. पण मीटर दरवाढीचे श्रेय घेण्यासाठी काहीजणांकडून मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या (कॅलिब्रेशन) व्यावसायिकांना दमदाटी केली जात आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजूर केलेली दरवाढ आम्हाला मंजूर नाही. आम्ही नवीन दरवाढ मंजूर करून आणेपर्यंत मीटर फेरफार करून देऊ नये असा दबाव आणला आहे. त्यामुळे गेले तीन महिने दरवाढ मंजूर होऊनही रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार न झाल्याने नुकसान झाले आहे.

याबाबत संबंधित फेरफार करणाऱ्या व्यावसायिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बोलावून मीटर फेरफार करण्याची सूचना केली. कार्यालयामार्फत या व्यावसायिकांना योग्य त्या सूचना द्याव्यात. जुन्या परवान्याची पद्धत सध्या बंद असल्याने ती तातडीने सुरू करुन दिलासा द्या अशा मागण्या निवेदनातून केल्या. शिष्टमंडळात चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, सुभाष शेटे, विजय गायकवाड, मोहन बागडी, ईश्वन चन्नी, शरफुद्दीन शेख, अरूण घोरपडे, विश्वास नांगरे, मधुसूदन सावंत आदींचा समावेश होता.

फोटो नं.०१०९२०२१-कोल-ऑटो०१

ओळ : रिक्षा व्यवसाय टिकविण्यासाठी आणखी भाडेवाढ करु नका, त्यापेक्षा मीटर फेरफार करणाऱ्यांना आवश्यक सूचना द्या. अशा मागणीचे निवेदन बुधवारी दुपारी जिल्हा रिक्षा एकीकरण संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना दिले. (छाया: नसीर अत्तार)

Web Title: Not raising fares, notify meter changers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.