या ना त्या कारणाने नागरिक रस्त्यांवर;  ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:24 PM2020-04-18T17:24:28+5:302020-04-18T17:27:27+5:30

प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊनदेखील येथील ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. याबद्दल प्रशासनाच्यावतीने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत होते.

This is not the reason on citizen roads | या ना त्या कारणाने नागरिक रस्त्यांवर;  ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पायदळी

या ना त्या कारणाने नागरिक रस्त्यांवर;  ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पायदळी

Next
ठळक मुद्देविशेष करून उपनगरात मोजकेच लोक रस्त्यांवर येत असल्याने दिवसभर या परिसरात शांतता दिसून येते.

 

कोल्हापूर : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व पोलीस यंत्रणेकडून कडक उपाययोजना केल्या असतानाही शहरातील काही भागात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. या ना त्या कारणाने नागरिक रस्त्यांवर येत गर्दी करीत आहेत.

शहरात ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. नागरिकांना या काळात भाजीपाला मिळावा यासाठी महानगरपालिकेच्यावतीने शहरातील नेहमीचा बाजार स्थलांतरित करून नव्या जागा निश्चित केल्या आहेत. मात्र, तिथेही खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. लोकांच्या अतिउत्साही, बेजबाबदारपणा व बेपर्वाईमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे. लक्ष्मीपुरी, मिरजकर तिकटी ते कोळेकर तिकटी व महानगरपालिका परिसर येथे भाजीपाला किंवा अन्य साहित्य घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येने वाहने येत होती.

किराणा माल दुकानात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून सुरक्षा बॉक्स तयार केले होते. असे असले तरी सकाळी व सायंकाळी अनेक ठिकाणी लोक विनाकारण किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. कोणी औषध घेण्यासाठी, कोणी दूध आणण्यासाठी तर कोणी भाजीपाला किंवा घरातील किराणा साहित्य आणण्याचे कारण सांगून बाहेर पडून रस्त्यांवर गर्दी करीत आहेत.

प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊनदेखील येथील ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. याबद्दल प्रशासनाच्यावतीने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत होते.

उपनगरांत नियमांचे पालन शहरातील ठरावीक भागात सकाळी व सायंकाळी गर्दी होते. बहुतांशी भागात नियमांचे पालनकेले जात असल्याचे दिसून आले. विशेष करून उपनगरात मोजकेच लोक रस्त्यांवर येत असल्याने दिवसभर या परिसरात शांतता दिसून येते.

Web Title: This is not the reason on citizen roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.