पोलिसांच्या अंगात बळ; पण छातीत कळ..! सहन होईना, सांगताही येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 01:24 PM2019-11-29T13:24:48+5:302019-11-29T14:08:27+5:30

एवढेच नव्हे तर आॅफ ड्यूटी असतानाही अनेकवेळा कामाच्या ओझ्याखालीच ते दबलेले असतात. घरातही ते तणावाखालीच वावरतात. परिणामी, या सर्वांचा त्यांच्या शरीरावर दुरगामी परिणाम होताना दिसतो. अनेक व्याधी त्यांना जडतात आणि त्याकडे होणाºया दुर्लक्षामुळे अनाहुतपणे त्यांना मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो.

Not tolerated, can't even say: Ann Duty of five policemen per month | पोलिसांच्या अंगात बळ; पण छातीत कळ..! सहन होईना, सांगताही येईना

पोलिसांच्या अंगात बळ; पण छातीत कळ..! सहन होईना, सांगताही येईना

Next
ठळक मुद्दे महिन्यात पाच पोलिसांचा आॅन ड्यूटी मृत्यूहृदयविकारासह अन्य आजार; तणावाचा परिणाम

संजय पाटील ।

क-हाड : सामाजिक स्वास्थ्य राखणाऱ्या अनेक पोलिसांचं शारीरिक स्वास्थ्य मात्र हरवलंय. कामाचा ताण, अपुºया सोयीसुविधा आणि व्याधींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक पोलीस धायकुतीला आलेत. जिल्ह्यात अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनाही सध्या वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले असून, त्यांच्या आरोग्याबाबत कोणीच गंभीर नसल्याची परिस्थिती आहे.

जिल्हा पोलीस दलातील पाच कर्मचाºयांचा या महिन्यात कर्तव्यावर असताना हृदयविकार आणि इतर कारणाने मृत्यू झाला. या घटना पोलीस दलाला हादरविणाºया तसेच पोलिसांचे बिघडते शारीरिक स्वास्थ्य अधोरेखित करणाºया आहेत. पोलिसांना चोवीस तास सतर्क राहावे लागते. ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा कसलाही विचार न करता कर्तव्य बजावावे लागते. आजाराचे कारण सांगून त्यांना जबाबदारी झटकता येत नाही आणि ह्यड्यूटीह्णवर असतानाही त्यांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. एवढेच नव्हे तर आॅफ ड्यूटी असतानाही अनेकवेळा कामाच्या ओझ्याखालीच ते दबलेले असतात. घरातही ते तणावाखालीच वावरतात. परिणामी, या सर्वांचा त्यांच्या शरीरावर दुरगामी परिणाम होताना दिसतो. अनेक व्याधी त्यांना जडतात आणि त्याकडे होणाºया दुर्लक्षामुळे अनाहुतपणे त्यांना मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो.

पोलीस दलात नव्याने भरती झालेले किंवा फक्त काही वर्षे सेवा बजावलेले अधिकारी, कर्मचारी त्यामानाने निरोगी असतात. मात्र, चार ते पाच वर्षे सेवा केली की त्यांनाही वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. जसजसं वय आणि सेवा वाढत जाते, तसतसे अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही, अशी बहुतांश पोलिसांची अवस्था असते.

पोलीस कर्मचारी सुदृढ रहावेत, यासाठी प्रशासनाकडून आरोग्य शिबिर तसेच परेडचे आयोजन केले जाते. शिबीरातून कर्मचा-यांना मार्गदर्शन होते. तसेच परेडमधून त्यांचा व्यायाम व्हावा, असा उद्देश असतो. मात्र, फक्त एवढ्यावरच पोलीस कर्मचारी सुदृढ होऊ शकत नाहीत. पोलिसांवरील ताणतणाव कमी झाला, त्यांना आवश्यक त्या वेळी आराम मिळाला तरच त्यांची मानसिक, शारीरीक झिज भरून येऊ शकते.

झीज.. शारीरिक अन् मानसिकही
पोलिसांचे कष्ट मर्यादित नसतात. त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही काम करावे लागते. गुन्ह्यांचा तपास तसेच कार्यालयीन कामात त्यांना अगदी टोकाचा आणि वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागतो. तर मोर्चा, आंदोलने, गर्दी बंदोबस्तावेळी त्यांच्या बळाचा वापर होतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही त्यांची दररोज झीज होते आणि ती भरून काढण्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा आराम त्यांना मिळत नाही, हे दुर्दैव.

बॉडीमास चाचणी नावालाच
पोलीस कर्मचा-यांचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी शासनामार्फत त्यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून ठराविक रक्कम दिली जाते. त्यासाठी कर्मचा-यांची बॉडीमास चाचणी घेतली जाते. त्यामध्ये ह्यफिटनेसह्ण तपासला जातो. वजन आणि उंचीच्या निकषावर आधारित या चाचणीत कर्मचारी पात्र ठरल्यास त्याला हा भत्ता मिळतो. मात्र, सध्या ही चाचणी आणि त्याचा मिळणारा भत्ताही रखडला आहे.

  • यांची झाली एक्झिट

१) विकास पवार सातारा मुख्यालय हृदयविकार
२) राजेंद्र राऊ...त कºहाड उपविभाग हृदयविकार
३) लक्ष्मण हजारे कोरेगाव पोलीस स्टेशन हृदयविकार
४) अतुल गायकवाड लोणंद पोलीस स्टेशन अपघात
५) खुशालचंद गायकवाड सातारा मुख्यालय आजारी

 

पोलीस महासंचालकांनी अधिकारी
कर्मचाºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशिक्षण, सुदृढता आणि सुसज्जता ही त्रिसूत्री हाती घेतली आहे. मात्र, जिल्हा पातळीवर सुदृढता आणि सुसज्जता याबाबत म्हणावे तेवढे काम होत नाही. धकाधकी, ताणतणाव यामुळे पोलिसांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आरोग्य शिबिरांबरोबरच पुरेसा वेळ आणि आराम मिळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे.
- संभाजी पाटील,
निवृत्त पोलीस उपअधीक्षक, सातारा

 

Web Title: Not tolerated, can't even say: Ann Duty of five policemen per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.