एकाच शाळेतील दोन शिक्षक एका परीक्षा केंद्रावर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:06+5:302021-09-16T04:30:06+5:30

परीक्षेच्या काटेकोर संचालनासाठी ज्या शाळेत परीक्षा केंद्र आहे, त्या शाळेतील शिक्षकांची नेमणूक पर्यवेक्षक म्हणून करण्यात येऊ नये. ज्या ...

Not two teachers from the same school at the same examination center | एकाच शाळेतील दोन शिक्षक एका परीक्षा केंद्रावर नको

एकाच शाळेतील दोन शिक्षक एका परीक्षा केंद्रावर नको

googlenewsNext

परीक्षेच्या काटेकोर संचालनासाठी ज्या शाळेत परीक्षा केंद्र आहे, त्या शाळेतील शिक्षकांची नेमणूक पर्यवेक्षक म्हणून करण्यात येऊ नये. ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचा शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या. भरारी पथके नेमून परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुखांना सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, पोलीस विभागाचे रामदास कोळी, निरंतर शिक्षण विभागाचे प्रतिनिधी राज म्हैंदरकर, गजानन उकिर्डे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी बी. एम. किल्लेदार उपस्थित होते.

कोरोना नियमांचे पालन करा

या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वितरण आणि उत्तरपत्रिका संकलनासाठी विभागीय मंडळामार्फत एकूण आठ परीक्षकांची नियुक्ती केली आहे. बारावीसाठी जिल्ह्यात दहा, तर दहावीसाठी अकरा परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. परीक्षक, सहायक परीक्षक, केंद्रसंचालकांची नियुक्ती कोल्हापूर विभागीय मंडळाने केली आहे. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्र संचालकांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Not two teachers from the same school at the same examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.