आजपासून लसीकरण नव्हे, तर प्रशिक्षण-प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:12+5:302021-03-01T04:28:12+5:30

कोल्हापूर : देशभरात आज सोमवारपासून ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण माेहीम सुरू होत आहे. कोल्हापुरात मात्र आजपासून चार दिवस प्रत्यक्ष ...

Not vaccination from today, but training-awareness | आजपासून लसीकरण नव्हे, तर प्रशिक्षण-प्रबोधन

आजपासून लसीकरण नव्हे, तर प्रशिक्षण-प्रबोधन

Next

कोल्हापूर : देशभरात आज सोमवारपासून ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण माेहीम सुरू होत आहे. कोल्हापुरात मात्र आजपासून चार दिवस प्रत्यक्ष लसीकरणाऐवजी लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होत आहे. केंद्र सरकारकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने म्हटले आहे. आजपासून ४ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, त्यानंतर प्रबोधन आणि सूचना आल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत लसीकरण होणार आहे, तर उर्वरितांना काही रक्कम माेजावी लागणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील साडेपाच लाख ज्येष्ठांची यादी तयार करून ठेवली आहे. तथापि, ज्येष्ठांची यादी संगणकात अपलोड करण्यासह अन्य बरीच कामे राहिली असल्याने आता लसीकरण सुरू करण्यात तांत्रिक अडचणी जास्त आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सध्या वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत आहे.

दरम्यान, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी खासगी दवाखान्यांची यादी केंद्र सरकारने रविवारी जाहीर केली आहे. येथे कोरानाचे लसीकरण शासन आदेशानंतर सुरू होणार आहे. यात कोल्हापुरातील ३६ खासगी दवाखान्यांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्व प्रमुख दवाखान्यासह जयसिंगपूर, शिरोळ, गडहिग्लज या तालुक्यातील दवाखान्यांचा समावेश आहे.

बॉक्स :

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक : ६ लाख ७० हजार

व्याधीग्रस्त नागरिक : ३ लाख ५० हजार

बॉक्स: जिल्ह्यात १६ जानेवारीपासून शासकीय कर्मचारी, आरोग्य, पोलीस या कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील हे लसीकरण ७० टक्के पूर्ण झाले आहे.

चौकट ०१

खासगी दवाखान्यांची यादी

१. कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑर्थेापेडीक्स आणि ट्रामा, स्टेशनरोड, कोल्हापूर.

२. वारणा इन्स्टिट्यूट ऑफ युरो सर्जरी, शाहूपुरी चौथी गल्ली, कोल्हापूर.

३. कॉन्टाकेअर आय हॉस्पिटल, स्टेशनरोड, कोल्हापूर.

४. मसाई हॉस्पिटल, सोमवारपेठ, लुगडी ओळ, कोल्हापूर,

५. केपीसी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर.

६. ॲपल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, भोसलेवाडी, कदमवाडी.

७. स्वस्तिक हॉस्पिटल, शिवाजी पार्क, कोल्हापूर.

८. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कदमवाडी.

९. जोशी हॉस्पिटल ॲन्ड डायलेसिस सेंटर दत्त कॉलनी, पुणे-बंगळूर हायवे.

१०. डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, महावीर कॉलेजजवळ, कोल्हापूर.

११. अथायू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, उजळाईवाडी.

१२. हृदया मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल हेर्लेे, कोल्हापूर-सांगली रोड.

१२. ट्यूलीप हॉस्पिटल, मार्केट यार्डरोड, रुईकर कॉलनी.

१३. ओम साई हॉस्पिटल, मेनरोड, कोल्हापूर.

१४. सिद्धिविनायक हार्ट फाउंडेशन, शास्त्रीनगर, कोल्हापूर.

१५.सिद्धिविनायक नर्सिंगहोम, टाकाळा मेनरोड, कोल्हापूर.

१६.संजीवनी हॉस्पिटल ॲन्ड क्रिटिकल केअर युनिट, जयसिंगपूर.

१७. हिरेमठ हॉस्पिटल, लक्ष्मीरोड, जयसिंगपूर.

१८. माने केअर हॉस्पिटल, लक्ष्मीरोड, जयसिंगपूर.

१९. शतायू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अर्जुनवाडरोड, शिरोळ.

२०. अनिश मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कुरुंदवाड, शिरोळ.

२१. केअर हॉस्पिटल, कोरोची, इंदिरानगर.

२२. कुडाळकर हॉस्पिटल, हातकणंगलेरोड.

२३. गिरिजा हॉस्पिटल, पेठवडगाव.

२४. यशवंत धर्मार्थ रुग्णालय, कोडोली.

२५. निरामय हॉस्पिटल, इचलकरंजी.

२६. अलायन्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, चंदूर.

२७.मगदूम एन्डो सर्जरी इन्स्टिट्यूट शास्त्रीनगर, कोल्हापूर.

२८. सदगुरू बाळूमामा ट्रस्ट हॉस्पिटल, अदमापूर.

२९. रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट, शाहूनगर, परिते घोटावडे, राधानगरी.

३०. यशोदा हॉस्पिटल सरुडरोड बांबवडे, शाहूवाडी.

३१. कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकूळ, शिरगाव.

३२. सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी.

३३. संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर.

३४.देसाई हॉस्पिटल डॉक्टर कॉलनी, कोल्हापूर.

३५. कै. केदारी रेडेकर हॉस्पिटल, शेंद्री माळ, गडहिंग्लज.

३६.संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल, महागाव, गडहिंग्लज.

Web Title: Not vaccination from today, but training-awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.