चुकीची माहिती देणाऱ्या ३७ शिक्षकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:57 AM2018-06-22T00:57:07+5:302018-06-22T00:57:07+5:30
कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाºया जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये अनेकांनी ‘सोयीची बदली’ व्हावी यासाठी चुकीची माहिती भरल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. गंभीर आजाराने आजारी असलेल्या शिक्षकांचा ‘संवर्ग १’ मध्ये समावेश होतो. दुसºया संवर्गामध्ये ‘पती-पत्नी सोय’ हा घटक येतो. तिसºयासंवर्गामध्ये ‘सुगम दुर्गम शाळा’ हा प्रकार येत असून चौथ्या प्रकारामध्ये बाहेरच्या जिल्ह्णातून आलेल्या शिक्षकांनी आपली मूळ नियुक्ती तारीख लिहून सेवाज्येष्ठतेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
काही शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने अपंग आणि आजारपणाचे दाखले घेतले आहेत तर काहींनी पती-पत्नी एकत्रिकरण नियमाचा फायदा घेण्यासाठी काही घोटाळे केले आहेत. हे सर्व प्रकार शासनाच्या निदर्शनास आले आहेत. यातील सकृतदर्शनी दोषी आढळलेल्या ३७ शिक्षक शिक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरुवारी ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढल्या आहेत.
तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली असून बदली होऊन आलेल्या सर्व तालुक्यांतील शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या १० दिवसांत ही छाननी करून याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल डॉ. खेमनार यांनी मागवला आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.
खोटी माहिती देणाºयांचे
धाबे दणाणले
‘आॅनलाईन माहिती भरली तर कोण विचारतोय,’ अशा आविर्भावात अनेकांनी चुकीच्या माहितीच्या आणि दाखल्यांच्या आधारे आपल्या बदल्या सोयीच्या कशा होतील याची जोडणी घातली. मात्र, आता दाखले कुणी दिले येथूनच चौकशी होणार असल्याने आणि चुकीची माहिती भरल्याने कारवाई अटळ मानली जात असल्याने अशांचे धाबे दणाणले आहे.