शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दोघांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:42 AM2021-03-04T04:42:35+5:302021-03-04T04:42:35+5:30
कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानाचे प्रस्ताव पाठविण्याबाबतच्या दिरंगाईप्रकरणी सहायक शिक्षण संचालक आणि कर्मचारी या दोघांना शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे ...
कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानाचे प्रस्ताव पाठविण्याबाबतच्या दिरंगाईप्रकरणी सहायक शिक्षण संचालक आणि कर्मचारी या दोघांना शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी कारणे दाखवा नोटीस दिली.
राज्य शासन आणि कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दिरंगाईमुळे कोल्हापूर विभागातील १०९ कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी अपात्र ठरली होती. त्यावर शिक्षण उपसंचालक आणि काही शिक्षक संघटनांनी पाठपुरावा करून अखेर सादर केलेले प्रस्ताव शासनाने स्वीकारले. प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. दरम्यान, या दिरंगाईबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा करण्यास सांगितले आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक सोनवणे यांनी दिली.