कोडोली रूग्णालयात आहार पुरविणाऱ्या ठेकेदारास नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 08:53 PM2018-10-08T20:53:33+5:302018-10-08T20:54:42+5:30

   Notice to Contractor Providing Food to Kodoli Hospital | कोडोली रूग्णालयात आहार पुरविणाऱ्या ठेकेदारास नोटिस

कोडोली रूग्णालयात आहार पुरविणाऱ्या ठेकेदारास नोटिस

Next
ठळक मुद्दे मुख्य ठेकेदारावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत नोटिस बजावणेत आली

कोडोली : कोडोली ( ता पन्हाळा) येथील उप जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना देणेत येणा-या आहारामध्ये कि डे व आळया सापडल्याप्रकरणी मुख्य ठेकेदारावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत नोटिस बजावणेत आली आहे. परिस्थिीतीचे गाभीर्य ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी रूंग्णालयास भेट देवूनरूग्णांच्या तब्बेतीबाबत तसेच झाल्याप्रकाराबाबत चौकशी केली.

येथील उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना आहार पुरविणेचा मुख्यठेका कैलास फूड अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स पेठ सातारा यांना आरोग्य विभागामार्फत दिला होता. मुख्य ठेकदारामार्फत संतोष जाधव रा. कोडोली यांना उपठेका दिला होता. रविवारी दुपारी रूग्णांना देणेत आलेल्या आहारामध्ये आळया व किडे असल्याचे काही रूग्णांच्या लक्षात आले. सदर रूग्णांनी ही बाब परिचारीकांच्या निदर्शनास आणली. आहारामध्ये आळया व किडे असल्याचे वैद्यकिय अधिकारी याची खात्री झाल्याने तात्काळ रूग्णांना दिलेला आहार परत घेतला. यावेळी काही रूग्णांनी न बघता जेवण केले होते.

सुदैवाने रूग्णांना काही त्रास झाला नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी उपठेकेदार जाधव यांनी आहार बनविणेसाठी आणलेले साहित्य रूग्णांलय प्रशासनाने जप्त केले असल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ सुनिल अभिवंत यांनी दिली.या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.केम्पी पाटील यांनी रूग्णालयास भेट देवून रूग्णांच्या तबेतेची सखोल चौकशी केली. रूग्णालय प्रशासनाने मुख्य ठेकेदार यांना झाल्या प्रकराबाबत शिस्तभंगा बाबत कारवाई का करू नये अशी नोटीस बजावणेत आली आहे.

 

Web Title:    Notice to Contractor Providing Food to Kodoli Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.