कामातील दिरंगाईबद्दल ठेकेदाराला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:09+5:302021-06-22T04:17:09+5:30
ते म्हणाले, सोनवडे ग्रा.पं.कडील सुमारे १ कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदार आनंदा दिवाण यांनी घेतले आहे. ...
ते म्हणाले, सोनवडे ग्रा.पं.कडील सुमारे १ कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदार आनंदा दिवाण यांनी घेतले आहे. हे काम पूर्ण कण्याचा कालावधी २१ जुलै २०१९ रोजी संपलेला आहे. तरीही आजअखेर या योजनेचे काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण करण्यासंदर्भात स्थानिक पाणी पुरवठा समितीने ठेकेदार दिवाण यांना वारंवार सूचना देऊन तसे लेखी कळविले होते. तसेच समिती सदस्यांनी प्रत्यक्ष भेटूनही काम पूर्ण करण्यासंदर्भात विनंती केली होती. परंतु ठेकेदार दिवाण यांनी आजअखेर हे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने कोणतीही कार्यवाही केली नाही. पाणी पुरवठा योजनेचे काम रखडल्याने गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. केवळ ठेकेदार दिवाण यांच्या कामातील दिरंगाईमुळेच हे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे दिवाण यांना अंतिम नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे. नोटीस मिळाल्यानंतर दोन दिवसात खुलासा न केल्यास दिवाण यांचा ठेका रद्द करण्याचा इशाराही या नोटिसांद्वारे दिल्याची माहिती विष्णू पाटील यांनी शेवटी दिली.
यावेळी सर्व ग्रा.पं. सदस्य, समिती सदस्य उपस्थित होते.