जिल्हा परिषदेच्या ५० हून अधिक शिक्षकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:05+5:302021-04-28T04:26:05+5:30
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या ५० हून अधिक प्राथमिक शिक्षकांना नोटिसा काढण्यास शिक्षण विभागाने सुरुवात ...
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या ५० हून अधिक प्राथमिक शिक्षकांना नोटिसा काढण्यास शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. शाळेत विनापरवानगी अनुपस्थित राहिल्याबद्दल नोटिसा काढण्यात येत असून मंगळवारी ११ शिक्षकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये राधानगरी, भुदरगड तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे.
गेल्या पंधरवड्यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी शाहूवाडीपासून चंदगडपर्यंत दौरा केला होता. यावेळी ५० हून अधिक शिक्षक त्या दिवशी शाळेकडेच फिरकले नव्हते. अशांशी त्यांनी शाळेतूनच संवाद साधला. दरम्यान, यानंतर उबाळे या त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे रजेवर होत्या. त्या दोन दिवसांपूर्वी हजर झाल्या आहेत.
त्यामुळे आता त्यावेळी गैरहजर राहिलेल्या शिक्षकांना नोटिसा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील असे ५० शिक्षक आढळले आहेत की जे कामावरच नव्हते. अशांकडून खुलासे मागविण्यात येणार आहेत. त्यातील मंगळवारी ११ नोटिसा निघाल्या असून उर्वरित नोटिसा दोन दिवसात काढण्यात येणार आहेत.
चौकट
पदाधिकाऱ्यांसह जि. प. सदस्यांची मध्यस्थी
उबाळे यांनी दौरा केल्यानंतर अशा नोटिसा निघणार याची कुणकुण लागलेल्या शिक्षकांनी त्याच दिवसापासून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांची मध्यस्थी सुरू केली आहे.