थकीत कर वसुली करिता महावितरणला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:31 AM2021-09-16T04:31:30+5:302021-09-16T04:31:30+5:30
रूकडी माणगाव : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाल आधारे माणगाव ग्रामपंचायतीने माणगाव येथील विद्युत महावितरण कंपनीकडून थकीत असलेले करापोटी थकीत ...
रूकडी माणगाव : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाल आधारे माणगाव ग्रामपंचायतीने माणगाव येथील विद्युत महावितरण कंपनीकडून थकीत असलेले करापोटी थकीत कर भरणेसाठी वसुलीचे नोटीस लागू केले आहे. माणगाव येथील विद्युत वितरण कंपनी विविध करापोटी
१ कोटी ३२ लाख रूपये थकबाकी माणगाव ग्रामपंचायतीचे देणे आहे.
माणगाव ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीस थकीत कर भरणा बाबत नोटीस लागू केली होती पण कराची रक्कम भरण्यास विद्युत वितरण कंपनी असमर्थता दाखविली होती याविरुद्ध माणगाव ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात याचिका सरपंच राजू मगदूम यानी दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या महावितरणच्या पोल , ट्रान्सफार्मर , उपकेंद्र , हायटेंशन पोल याचा थकीत कर वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतीला अधिनियमातील तरतुदी नुसार आहे तो माणगाव ग्रामपंचायतीने अधिकाराचा वापर करून कर वसुली करावी असा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एफ. जे. काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने दिला होता.