हॉटेल, लॉजचालकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:57 PM2019-11-21T12:57:29+5:302019-11-21T13:00:03+5:30
अशा महिलांना प्रवेश देऊ नये. दिल्यास वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देता म्हणून हॉटेलमालक, चालक यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. यात्री निवास व्यवसायधारकांनाही ही नियमावली लागू आहे. परदेशी नागरिकांनी लॉजमध्ये प्रवेश केला असल्यास
कोल्हापूर : हॉटेलमध्ये गुपचूप वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. तसेच इतर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल, लॉजचालकांची बैठक घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्याच्या नोटिसा पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी बुधवारी दिल्या.
हॉटेल, लॉजमध्ये येणाºया प्रत्येक ग्राहकाच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत आणि सही घेऊन त्यांनी कधी प्रवेश केला, कधी बाहेर पडले याची नोंद रजिस्टरमध्ये घ्यावी. ग्राहकाकडे कोणत्याही प्रकारचे हत्यार किंवा घातक शस्त्रे नाहीत, याची दक्षता घ्यावी. त्यांच्या हालचालीींवर बारीक लक्ष ठेवून संशयास्पद वाटत असेल तर तत्काळ पोलिसांना कळवावे. लॉजमध्ये, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. ग्राहक कोणत्या कारणासाठी आला आहे, त्याची नोंद रजिस्टरमध्ये करावी. हॉटेलमध्ये गुपचूप वेश्याव्यवसाय करणा-या महिलांची संख्या वाढत आहे.
अशा महिलांना प्रवेश देऊ नये. दिल्यास वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देता म्हणून हॉटेलमालक, चालक यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. यात्री निवास व्यवसायधारकांनाही ही नियमावली लागू आहे. परदेशी नागरिकांनी लॉजमध्ये प्रवेश केला असल्यास त्याबाबतची लेखी माहिती आपण पोलीस ठाणे, जिल्हा विशेष शाखा यांना द्यावी, आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणी नियमबाह्य व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशा इशाºयाच्या नोटिसा हॉटेल, लॉजमालक, चालक यांना दिल्या.
शहरात हॉटेल, लॉजमध्ये अनेक महिला गुपचूप वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच सराईत गुन्हेगार हॉटेलचा आसरा घेत असतात. असे प्रकार रोखण्यासाठी हॉटेलमालक, चालकांची बैठक घेऊन त्यांना लेखी सूचना दिल्या आहेत.
- अनिल गुजर : पोलीस निरीक्षक, लक्ष्मीपुरी