आता ‘अ‍ॅडमिशन’चे नो टेन्शन...!

By Admin | Published: March 22, 2015 12:35 AM2015-03-22T00:35:32+5:302015-03-22T00:36:24+5:30

‘लोकमत’चे मिशन अ‍ॅडमिशन गुरुवारपासून : एकाच छताखाली सर्व उपलब्ध

Now 'Admission' no tension ...! | आता ‘अ‍ॅडमिशन’चे नो टेन्शन...!

आता ‘अ‍ॅडमिशन’चे नो टेन्शन...!

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापुरातील कोणती इंग्रजी माध्यमाची शाळा चांगली आहे, प्रवेश कधी सुरूहोणार, प्रवेश शुल्क किती असणार यासंबंधीची माहिती घेण्यासाठी आता तुम्हाला दारोदार फिरण्याची गरजच नाही. कारण ही सर्व माहिती तुम्हाला एकाच छताखाली उपलब्ध झाली तर..! होय, तसेच होणार आहे. कारण त्यासाठीच ‘लोकमत’ने मिशन अ‍ॅडमिशन हे आगळेवेगळे प्रदर्शन घेतले असून, गुरुवार (दि. २६ मार्च)पासून तीन दिवस ते सुरू राहणार आहे. कमला कॉलेजजवळच्या व्ही. टी. पाटील सभागृहात हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, त्याची पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
मिशन अ‍ॅडमिशन’ - समर कॅम्प एक्स्पो २०१५ या प्रदर्शनामध्ये कोल्हापुरातील नामवंत स्कूलची माहिती मिळू शकेल. त्यामुळे या शाळांत फिरण्यासाठी होणारी धावपळ टाळता येऊ शकेल. तुमच्या मुलांस कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास त्या शाळेत नेमक्या काय सोयीसुविधा आहेत, त्यांचा ‘फी’चा पॅटर्न कसा आहे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ती शाळा नेमके काय प्रयत्न करते, यापासून शाळेतील भौतिक सोयी-सुविधांची माहितीही तुम्हाला या प्रदर्शनात मिळू शकेलच, शिवाय त्या शाळेच्या प्रतिनिधींशी तुम्हाला समोरासमोर बसून चर्चाही करता येऊ शकेल. सर्वच शाळांची माहिती व फी यासंबंधीची माहिती मिळाल्यास तुम्हाला तुमच्या पाल्यासाठी उत्तम शाळेचा पर्याय निवडण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. शाळांनाही कमीतकमी खर्चामध्ये एकाचवेळी अनेक पालकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळू शकेल.
या प्रदर्शनामध्ये शाळा, कोचिंग क्लासेस, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अबॅकस, अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूट, आर्ट अँड क्राफ्ट, करिअर मार्गदर्शन, सर्व प्रकारचे स्पोर्टस् कोचिंग क्लासेस, नृत्य, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, संगीत वाद्ये, स्मरणशक्ती, योगासन, व्यक्तिमत्त्व विकास, स्पोकन इंग्लिश कोर्सेस, बुद्ध्यांक मूल्यमापन मार्गदर्शनापासून ते मुलांचा आहार चांगला कसा असावा यासंबंधीचेही ‘डायट प्लॅनिंग’ करून देणाऱ्या स्टॉलपर्यंतची सगळी माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंबंधीच्या संस्था या प्रदर्शनात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी व स्टॉल बुकिंगसाठी राहुल- ९९२२९४४००१, सचिन- ९७६७२६४८८५ यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Now 'Admission' no tension ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.