आता शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात साडेसात हजार परवाने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:28+5:302021-07-07T04:29:28+5:30

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात स्वसंरक्षण, खेळ, शेत पिकांच्या संरक्षणासाठी असे एकूण साडेसात हजार बंदुकीचे परवाने जिल्हा प्रशासनाने ...

Now also the fashion of arms licenses; Seven and a half thousand licenses in the district! | आता शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात साडेसात हजार परवाने !

आता शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात साडेसात हजार परवाने !

googlenewsNext

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात स्वसंरक्षण, खेळ, शेत पिकांच्या संरक्षणासाठी असे एकूण साडेसात हजार बंदुकीचे परवाने जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ही कारणे पुढे करूनही काही जणांनी फॅशन म्हणूनही शस्त्र परवाना काढला आहे. यातूनच काही ठिकाणी परवानाधारी बंदूक खांद्याला रपेट मारणारेही हौशी दिसून येतात.

सध्याच्या काळातही बंदूक वापरण्याची हौस अनेकांमध्ये आहे. यातूनच प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण आलेल्या अर्जांची छाननी करून पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर परवाना मिळण्याचे प्रमाण कमी आहे. परवाना घेतलेल्या बंदुकीचा माध्यमातून नाहक कुणाला तरी धमकावणे, दहशत निर्माण करणे, हवेत गोळीबार करणे अशा प्रकारे गैरवापरही होण्याची शक्यता असते. पुुलाची शिरोली येथे परवान्याच्या बंदुकीतून हवेत गोळीबार करण्याची घटना वर्षापूर्वी घडली होती. त्याची चौकशी करून संबंधिताचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. असे प्रकार घडताच पोलीस आणि महसूल प्रशासन तातडीने संबंधिताचा बंदूक परवाना रद्द करते.

१) जिल्ह्यातील एकूण शस्त्रपरवाने - ७५००

तालुकानिहाय शस्त्र परवान्यांची संख्या अशी : कोल्हापूर शहर : ३०००, करवीर : १०००, शिरोळ : ४००, हातकणंगले : ६००, पन्हाळा : ३५०, शाहूवाडी : १५०, गगनबावडा : १५०, चंदगड : १५०, राधानगरी : २५०, भुदरगड : ४००, आजरा : २००, कागल : ३५०, गडहिंग्लज : ५००

२) चौकट

कोल्हापूर शहरात सर्वाधिक

जिल्हयात सर्वाधिक शस्त्रपरवाने कोल्हापूर शहरात आहेत. याउलट सर्वात कमी शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड तालुक्यात शस्त्र परवाने आहेत. या डोंगराळ तालुक्यातील शस्त्र परवाने शेती पिकांच्या संरक्षणासाठीचे आहेत. शहरातील परवान्यात स्वसंरक्षण आणि खेळांसाठीचे परवाने जास्त आहेत.

३) चौकट

शस्त्र परवाना काढायचा कसा?

बंदूक या शस्त्र परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो. हा अर्ज पोलिसांच्या विशेष शाखेकडे पाठवण्यात येतो. तेथून अर्जदार कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्या पोलीस प्रशासनाकडे तो अर्ज जातो. अर्जदाराची चौकशी करून अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडे येतो. यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे येतो. त्यानंतर जिल्हाधिकारी परवाना देण्यासंबंधीचा निर्णय घेेतात.

चौकट

४) पाच वर्षांत वाढले परवाने

फॅशन, प्रतिष्ठा, आत्मसंरक्षण, शेती पिकांचे संरक्षण, खेळांच्या सरावासाठी बंदूक वापरण्याचा परवाना दिला जातो. असे परवाने सन २०१८ आणि २०१९ या दरम्यान अधिक वाढले. अजूनही दिवसेंदिवस परवान्यांच्या संख्येत वाढच होत आहे. प्रत्येक वर्षी २० ते २५ परवान्यांची भर पडत आहे.

५) शस्त्र सांभाळणे कठीण

परवाने असलेल्या शस्त्राद्वारे इतराने गुन्हा केल्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे ते सांभाळणेही तेवढेच कठीण काम आहे. यामुळे शस्त्र परवाना ज्यांच्या नावे आहे, त्यांनी सुरक्षितपणे शस्त्र सांभाळणे महत्त्वाचे आहे. निवडणुकांच्या कालावधीत परवानाधारी शस्त्र जमा करावे लागते. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा ते पोलिसांकडून परत आणावे लागते.

Web Title: Now also the fashion of arms licenses; Seven and a half thousand licenses in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.