आता सरकार सर्वांना ‘आनंदी’ ठेवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:11 AM2018-02-26T00:11:39+5:302018-02-26T00:11:39+5:30

Now the government will keep everyone happy! | आता सरकार सर्वांना ‘आनंदी’ ठेवणार!

आता सरकार सर्वांना ‘आनंदी’ ठेवणार!

Next

समीर देशपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नापिकी, बोंडअळी अन् गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेले शेतकरी, नोकºया मिळत नसल्याने वैतागलेले बेरोजगार, जीएसटीच्या त्रासदीमुळे संतापलेले व्यापारी आणि भाववाढीत भरडली जात असलेली सर्वसामान्य जनता या सर्व समाजघटकांना सदोदित ‘आनंदी’ ठेवण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला आहे. नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी लवकरच नवे मंत्रालय सुरू होत असून साहजिकच याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.
जगभरामध्ये ‘आनंदाचा निर्देशांक’ ही संकल्पना आता महत्त्वाची मानली जात आहे. एखाद्या देशातील, राज्यातील नागरिक किती आनंदी आहेत यावर हा निर्देशांक काढला जातो. गतवर्षीच्या जागतिक अहवालामध्ये नॉर्वे हा देश यामध्ये पहिल्या क्रमांकावर असून भारत १२२ व्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशमध्ये अशाप्रकारे नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी म्हणून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले असून याच धर्तीवर महाराष्ट्रातही असे मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, कनिष्ठ मध्यमवर्गीय हे आपल्या रोजच्या जगण्याच्या संघर्षातच अडकून पडतात. हातावरचे पोट असणाºयांची तर आणखी बिकट परिस्थिती असते.एका ठरावीक वर्तुळाच्या बाहेरचे जग त्यांच्यासाठी अप्रूप असते. पर्यटनस्थळांची सहल, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहणे, एखाद्या मोठ्या संगीतविषयक कार्यक्रमाला जाणेही त्यांच्यासाठी अशक्यप्राय असते. अशांना आनंद देण्यासाठी शासन काय करू शकेल याबाबत हे मंत्रालय काम करणार असून त्याद्वारे निर्णय होऊन तशा उपक्रमांचे आयोजन शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
सध्या याबाबतचे कच्चे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्याला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर अशा पद्धतीने नवीन मंत्रालयाची स्थापना, त्याच्यासाठी निधी, आवश्यक अधिकारी, कर्मचारी वर्ग ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. मात्र, यावर्षी हे नवीन मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात काम सुरू
अशा पद्धतीचे काम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्'ात सुरूही केले आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांत पोलीस उद्यानाचे, शहरातील सर्व दुभाजकांचे सुशोभीकरण, नवरात्रानिमित्त नवउर्जा महोत्सव, भव्य फ्लॉवर फेस्टिव्हल, पाच दिवसांचा कलामहोत्सव आयोजित केला होता. गेल्याच पंधरवड्यात त्यांनी धनगरवाड्यावरील १५० पेक्षा अधिक मुलांना कोल्हापूर दाखवण्यासाठी आणले होते. आता एप्रिलमध्ये माहिती नसलेले कोल्हापूर दाखवण्यासाठी मोफत सहलींचेही आयोजन करण्यात येणार आहे. हेच प्रारूप नंतर महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.

जगण्याच्या संघर्षामध्ये अनेक छोटे-मोठे आनंद घेण्यापासून नागरिक हिरावले जातात. तोच आनंद त्यांना मिळवून देण्यासाठी या विषयासाठी वाहिलेले नवीन मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसनअंतर्गतच ते राहणार असल्याने त्याचा कार्यभारही माझ्याकडे असेल. सामान्याला आनंद देणाºया अनेक बाबी आम्ही या माध्यमातून करू.
- चंद्रकांत पाटील,
महसूल, मदत पुनर्वसन मंत्री

Web Title: Now the government will keep everyone happy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.