आता पदवी, अन्य अभ्यासक्रमांचे पुढील प्रवेश कसे होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:43+5:302021-06-04T04:18:43+5:30

परीक्षांबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. ...

Now how will the next admission be for degree, other courses? | आता पदवी, अन्य अभ्यासक्रमांचे पुढील प्रवेश कसे होणार ?

आता पदवी, अन्य अभ्यासक्रमांचे पुढील प्रवेश कसे होणार ?

Next

परीक्षांबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. मे महिना संपत आला, तरी परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून पर्याय निश्चित होत नसल्याने बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते. परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आमच्यावरील मानसिक तणाव कमी करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून झाली होती. कोरोनामुळे सीबीएसई बारावीची परीक्षा रद्दचा बुधवारी निर्णय झाला. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेदेखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी दुपारी जाहीर केला. त्यावर कोरोनामुळे परीक्षा रद्द केली हे ठीक आहे. मात्र, बारावीच्या मूल्यमापन आणि पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमांच्या पुढील प्रवेशाचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली आहे.

प्राचार्य म्हणतात?

पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा विचार करता बारावीच्या चार ते पाच विषयांची परीक्षा होईल असे वाटत होते. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे धोरण शासनाने लवकर जाहीर करावे.

-व्ही. एम. पाटील, न्यू कॉलेज.

परीक्षा रद्द झाल्याने आता पारंपरिक विद्याशाखांच्या प्रवेशासाठी मेरिट लावताना अडचण होणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याने त्याठिकाणी हा प्रश्न फारसा उद्‌भवणार नाही.

-आर. आर. कुंभार, विवेकानंद कॉलेज.

विद्यार्थी म्हणतात?

परीक्षा घेतली असती, तर चांगले झाले असते, पण वाढत्या कोरोनामुळे सरकारने परीक्षा रद्दचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकर जाहीर करून प्रक्रिया पूर्ण व्हावी.

-तेजस पोवार, वळीवडे.

आम्ही वर्षभर अभ्यास केला होता, पण कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली. जून महिना आला तरी परीक्षा होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती आता दूर झाली.

-करिना चव्हाण, नागाव.

जिल्ह्यात आकडेवारी दृष्टिक्षेपात

एकूण परीक्षार्थी : ५१,७६६

मुलांची संख्या : २९०००

मुलींची संख्या : २२७६६

Web Title: Now how will the next admission be for degree, other courses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.