आता विकासकामांकडे लक्ष द्या, मित्तल यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 10:49 AM2020-10-09T10:49:03+5:302020-10-09T10:50:19+5:30
zilaparishad, kolhapurnews, amanmittial,ceo, गेली सहा महिने आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहोत. आता त्याची तीव्रता कमी होत आहे. तेव्हा सर्वांनीच आपल्या महत्त्वाच्या विकासयोजनांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केल्या आहेत.
कोल्हापूर : गेली सहा महिने आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहोत. आता त्याची तीव्रता कमी होत आहे. तेव्हा सर्वांनीच आपल्या महत्त्वाच्या विकासयोजनांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केल्या आहेत.
त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून गुरुवारी जिल्ह्यातील १२ गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांचे लक्ष्य हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचे होते. ते काम आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने केले आहे. परंतु, आता कोरोनाची तीव्रता कमी येत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मनरेगामधून खूप काम करण्याची कोल्हापूर जिल्ह्यात संधी आहे. राज्य सरकारनेही त्यासाठी विशेष नियोजन केले आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निधीही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नियोजनपूर्वक कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख उपस्थित होते.