आता एका क्लिकवर मिळणार मोर्चाची संपूर्ण माहिती
By admin | Published: October 5, 2016 01:02 AM2016-10-05T01:02:45+5:302016-10-05T01:02:45+5:30
मोबाईल अॅपची निर्मिती : मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीला वेग--मूक मोर्चाचा आवाज जगभर : पाटील
संतोष तोडकर --कोल्हापूर
मराठा क्रांती मूकमोर्चाची लोकप्रियता व त्यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. याची प्रचिती राज्यातील विविध जिल्ह्णांतून निघत असलेल्या मोर्चामधून येत आहे. लाखोंच्या संख्येने निघणारे हे मोर्चे कुणाच्या एका छताखाली नसल्याने नियोजनात एका व्यक्तीला अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्यातूनच तरुणाईचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या सोशल मीडियाचा आधार प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी घेतला जात आहे. त्यातूनच ‘मराठा क्रांती मूक मोर्चा-कोल्हापूर’ या अॅपची निर्मिती करण्यात आली असून आता सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
याद्वारे महाराष्ट्रात आजवर झालेल्या सर्व मोर्चातील क्षणचित्रे व व्हिडिओज उपलब्ध करून देण्यात आली आहेत तसेच जिल्ह्णात मोर्चासंबंधी होत असलेल्या सभा, बैठका, नियोजन, स्टीकर्स , टी शर्टस याबद्दल माहिती मिळणार असून कार्यकर्तेही मोर्चासंदर्भातील फोटो व व्हिडीओज या माध्यमातून अपलोड करू शकणार आहेत. मोर्चाच्या दिवशी शहरातील विविध चौकांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून त्याचे थेट प्रक्षेपण या अॅपद्वारे जगभर पोहोचविण्यात येणार आहे.
जिल्ह्णातील सर्वच कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचता यावे या हेतूने ६६६. ें१ं३ँं‘१्रल्ल३्र‘ङ्मस्र.ूङ्मे ही वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे जिल्ह्णातील स्वयंसेवकांची नोंद करण्यात येत आहे तसेच तालुका स्तरावर स्टीकर्स, बॅनर्स उपलब्ध व्हावेत यासाठी त्याचे डिझाईन्स या वेबसाईटवर पाहावयास मिळणार आहेत. या वेबसाईटची निर्मिती शिरीष जाधव यांनी केली आहे.
कोल्हापूरच्या मोर्चाबाबत जिल्ह्णासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मोर्चाची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविण्यासाठी दसरा चौक येथे वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहावी तसेच या निमित्ताने कोणी अफवा वा चुकीचे संदेश पसरवू नये यासाठी मोर्चाच्या निमित्ताने तयार केलेल्या विविध व्हॉटस् अॅप ग्रुप्स व फेसबुक पेजवरील अपडेटस्वर वॉर रूमच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे तसेच मोर्चासंबंधी अपडेटस् व माहितीपूर्ण लेख वॉर रूममधून फिल्टर करून फॉरवर्ड करणे, स्वयंसेवकांना व कार्यकर्त्यांना बल्क मेसेज करणे ही कामे येथून केली जाणार आहेत. त्यासाठी मनोज नरके, प्रतीक जगताप, शिवराज जाधव, सिद्धी घाडगे, अक्षय शिंदे, भास्कर सबनीस, प्रशांत बर्गे, सचिन पाटील, संग्राम शिंदे या
तरुण शिलेदारांची टीम परिश्रम घेत आहे.
अॅप कसे वापराल ?
गुगल प्ले स्टोअरवर गेल्यास ‘एल्लङ्म६’ हे अॅप दिसेल. ते डाऊनलोड केल्यानंतर त्यावर आपला ई-मेल आयडी भरावा लागेल. त्यानंतर ‘मराठा क्रांती मोर्चा-कोल्हापूर’ हा आयकॉन दिसेल. रजिस्टर करण्यासाठी त्यावर आपले नाव व मोबाईल नंबर भरावा लागेल. त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर संदेश स्वरुपात आलेला ‘ओटीपी’ क्रमांक भरल्यास अॅपच्या होम पेज दिसेल. या अॅपची निर्मिती विनायक भोगम यांनी केली आहे.
मूक मोर्चाचा आवाज जगभर : पाटील
कोल्हापूर : आर-पारच्या लढाईसाठी मराठे रस्त्यावर उतरले आहेत. आमचे मोर्चे मुक निघत असले तरी यांचा आवाज जगभर घुमत आहे. या लढाईत कोल्हापूरकरांनी मागे न राहता मोठ्या संख्येने उपस्थित राहून १५ तारखेचा मोर्चा यशस्वी करण्याची गरज आहे, अन्यथा आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असे प्रतिपादन मराठा आरक्षण कोल्हापूर जिल्हा कोअर कमिटी सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी केले. शिये (ता करवीर) येथे मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच विश्वास पाटील होते.
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, शैक्षणिक व्यासपीठाचे एस डी लाड ,जिल्हापरिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश पाटील यांनी केले . यावेळी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशिद, छ.राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग पाटील, प्रा. एच. आर. पाटील, भाजपाचे शिवाजी बुवा, यांची भाषणे झाली.
यावेळी विकास चौगले, रणजीत कदम, चंद्रकांत जाधव, जालिंदर शिंदे, सरदार पाटील, शशिकांत पाटील , कृष्णात चौगले, प्रभाकर काशिद, बाबासो कांबळे, उत्तम पाटील, अशोक पाटील, महेश पाटील, रमेश तासगावकर यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दलित समाजाचा पाठिंबा
कोल्हापुरात १५ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांति मोर्च्यास शियेतील दलित समाजाने पाठिंबा दिला आहे. यामध्ये उपसरपंच सतीश कुरणे, माजी सरपंच दयानंद कांबळे, प्रभाकर कुरणे, भरत कांबळे, भास्कर मालेकर, विश्वास वाघवेकर, मयुरेश कांबळे, निलेश कांबळे, प्रवीण शिर्के, सागर कुरणे, सुनील कुरणे, सतीश उलस्वार, प्रवीण कुरणे, रमेश आढाव, अभिजीत कुरणे, विरेंद्र मालेकर, अभिजीत कुरणे, किशोर कुरणे, सुमीत मालेकर आणि सतीश मालेकर यांचा समावेश आहे.
मोर्चासाठी दुबईहून येणार
सध्या दुबईमध्ये नोकरीस असलेला शिये येथील वैभव विजय पाटील हा खास मोर्चासाठी येणार असल्याचे त्याच्या मित्रांनी यावेळी सांगितले.