आता महापालिकेवर भगवा

By Admin | Published: October 30, 2014 01:08 AM2014-10-30T01:08:26+5:302014-10-30T01:08:49+5:30

शिवसेनेचा मेळावा : कार्यकर्त्यांनी केला निर्धार

Now the saffron saffron corporation | आता महापालिकेवर भगवा

आता महापालिकेवर भगवा

googlenewsNext

कोल्हापूर : महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करीत शिवसेनेने आज, बुधवारी रात्री येथे झालेल्या मेळाव्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेसोबत येण्याचे ठरविले तर आनंदच होईल. जर ते नाही आलेत तर ‘एकला चलो रे’चा नारा देत ही निवडणूक लढू, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. येत्या दहा महिन्यांत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेसमोर जाऊन विश्वास संपादन करा, संघटना बळकटीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना दिल्या.
गेल्या पंचवीस वर्षांतील सोबती असलेला आपला मित्रपक्ष विधानसभेवेळी आपल्यासोबत नव्हता; परंतु आता निवडणुकीनंतर पुन्हा युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष सोबत असो अथवा नसो; आपणाला मात्र सर्व ताकदीनिशी महापालिकेची निवडणूक लढवून भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आतापासूनच हे शिवधनुष्य उचलावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी यावेळी केले. शिवसेना आणि कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असल्यामुळेच माझ्यासारख्या शिवसैनिकाचा विजय झाला. दहा महिन्यांनंतर येणाऱ्या निवडणुकीतही जनता शिवसेनेच्या पाठीशी राहील, असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
उत्तर व दक्षिण मतदारसंघांत विभागनिहाय बैठका घेऊन प्रत्येक प्रभागातून कोण-कोण इच्छुक आहेत, याचा शोध घेण्यात येईल. यशापर्यंत पोहोचणाऱ्या इच्छुकांचा शोध घेऊन आतापासूनच प्रभागात कामाला लागण्याचे आदेश आजच्या मेळाव्यात देण्यात आले. यावेळी प्रा. विजय कुलकर्णी, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, माजी उपमहापौर उदय पोवार, आदींनी आपल्या भाषणात भाजप व शिवसेनेची सत्ता येवो आणि राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली. याप्रसंगी किशोर घाडगे, व्यापारी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर, विजय पोळ, जयवंत हारुगडे, आदी उपस्थित होते. धर्माजी सायनेकर यांनी प्रास्ताविक केले, तर पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Now the saffron saffron corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.