आता म्युकरवरील इंजेक्शन्सची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:41+5:302021-06-04T04:18:41+5:30
या इंजेक्शनच्या वितरणाचे सर्व अधिकार येथील आरोग्य उपसंचालकांना देण्यात आले आहेत. ते चार जिल्ह्यांसाठी खरेदी करत असून सीपीआरमार्फत प्राधान्याने ...
या इंजेक्शनच्या वितरणाचे सर्व अधिकार येथील आरोग्य उपसंचालकांना देण्यात आले आहेत. ते चार जिल्ह्यांसाठी खरेदी करत असून सीपीआरमार्फत प्राधान्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आणि त्यानंतर खासगी रुग्णालयातील रुग्णालयांसाठी इंजेक्शन्स वितरित करण्यात येत आहेत. यासाठी नातेवाईक अक्षरश: रात्री रांग लावण्यासाठी सीपीआर आवारात येऊन झोपत आहेत.
सध्या सीपीआरमध्ये ६० हून अधिक रुग्ण उपचार घेत असून प्रत्येकाला रोज किमान ५ इंजेक्शन्स द्यावी लागतात. मंगळवारी शासकीय रुग्णालयांतील रुग्ण सोडून खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी केवळ ११ इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत. बुधवारी सगळ्यांसाठी १५० इंजेक्शन्स आली, तर गुरुवारी दिवसभरात एकही इंजेक्शन मिळालेले नाही. एक तर या इंजेक्शन्सची किंमत जास्त आहे. तरीही नागरिक पैशाची जुळवाजुळव करून इंजेक्शन्स नेण्यासाठी येत आहेत; परंतु आरोग्य विभागाकडेच इंजेक्शन्स उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.