सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १६ हजारांवरून दोन हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:28 AM2021-08-22T04:28:48+5:302021-08-22T04:28:48+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने खाली येत असून ती आता दोन हजारांवर आली आहे. ...

The number of active corona patients has increased from 16,000 to 2,000 | सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १६ हजारांवरून दोन हजारांवर

सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १६ हजारांवरून दोन हजारांवर

googlenewsNext

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने खाली येत असून ती आता दोन हजारांवर आली आहे. नवे १९१ रुग्ण नोंदवण्यात आले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. २२३ नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३१ मे रोजी दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक १६ हजार १५ अशी उच्चांकी सक्रिय रुग्णसंख्या होती. ती आता अडीच महिन्यात दोन हजारांवर आली आहे.

कोल्हापूर शहरात नव्याने ३८, हातकणंगले तालुक्यात ३३ आणि करवीर तालुक्यात २१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चौघांचा मृत्यू झाला असून यामध्ये कोल्हापूर शहर, हातकणंगले, पन्हाळा आणि कागल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या लाटेचा पुन्हा प्रादुर्भाव सुरू झाला. मे महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. ३१ मे रोजी कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजारांवर पोहोचली. परंतु त्यानंतर अतिशय संथ गतीने ही संख्या कमी येत गेली. २५ जुलैपासून ही संख्या वेगाने खाली येत राहिली असून आता केवळ दोन हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तालुकावार मृत्यू

कोल्हापूर ०१

शाहुपुरी

हातकणंगले ०१

मनपाडळे

पन्हाळा ०१

केर्ले

कागल ०१

माद्याळ

चौकट

गेल्या दहा दिवसातील आकडेवारी

तारीख पॉझिटिव्ह रूग्ण मृत्यू

११ ऑगस्ट ३२७ ०७

१२ ५१४ ०९

१३ ४७१ १२

१४ ३७४ १०

१५ २६७ ०५

१६ २९३ ०५

१७ १८३ ०९

१८ २३४ १२

१९ १७६ ०३

२० १९७ ०६

२१ १९१ ०४

एकूण ३२२७ ८२

Web Title: The number of active corona patients has increased from 16,000 to 2,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.