कोरोनामुक्तांचा आकडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:35+5:302021-07-08T04:17:35+5:30

कोल्हापूर : अनलॉकमुळे व्यवहार सुरू होत असताना हळूहळू कोरोनाचा संसर्गही कमी होऊ लागल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी ...

The number of coronamuktas increased | कोरोनामुक्तांचा आकडा वाढला

कोरोनामुक्तांचा आकडा वाढला

Next

कोल्हापूर : अनलॉकमुळे व्यवहार सुरू होत असताना हळूहळू कोरोनाचा संसर्गही कमी होऊ लागल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी कोरोना रुग्णापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा १५८ ने जास्त आहे. नवे १४५४ रुग्ण आढळले तर, २५ जणांचा मृत्यू झाला. तर १६१२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. करवीरमध्ये सर्वाधिक १० मृत्यू झाल्याने या तालुक्यावर आता विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर वेगाने कमी होऊ लागल्याने निर्बंधही शिथिल होऊ लागले आहेत. बऱ्यापैकी व्यवहार सुरू झाल्याने तीन महिन्यांपासून विस्कटलेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. सर्वच दुकाने सुरू केल्याने गर्दी वाढून कोरोना रुग्ण वाढतील, अशी भीती व्यक्त केली जात होती, पण दुकाने सुरू झाल्याच्या तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत रुग्णवाढीपेक्षा ते कमी होत असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभर १२ हजार ७२९ कोरोना चाचण्या झाल्या. सध्या कोरोना चाचण्यांचाही वेग वाढवण्यात आला असून, त्यामुळे पहिल्या टप्प्यातच रुग्ण सापडत असून त्यांच्यावर जलद उपचारही होत असल्याने कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे, ही दिलासादायक बाब आहे.

चौकट

सीपीआरमध्ये सर्वाधिक मृत्यू

बुधवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरानाने २५ जणांचा बळी घेतला. त्यातील २२ जण जिल्ह्यातील आहेत, तर तिघे बाहेरील जिल्ह्यातील आहेत. मृत पावलेले २५ पैकी तब्बल १४ जणांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला आहे, तर आयजीएम इचलकरंजीत एक, गडहिंग्लज रुग्णालयात दोन तर, शहरातील खासगी दवाखान्यात सात मृत्यू झालेले आहेत. कोरोनावर सर्वात चांगले उपचार सीपीआरमध्ये होत असताना, तेथेच मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याने वेगळीच चिंता व्यक्त केली जात आहे. यामागे रुग्ण अत्यवस्थ झाल्यावरच सीपीआरकडे पाठवण्याची डॉक्टरांची प्रवृत्ती वाढल्यामुळेही असे घडू शकते.

चौकट

आज झालेले मृत्यू

कोल्हापूर शहर : ०३ दौलतनगर, राजेंद्रनगर, मातंग वसाहत,

करवीर : १० मुडशींगी, उचगाव, पाचगाव, निटवडे, पासार्डे, म्हालसवडे, सरनोबतवाडी, कदमवाडी, नाना पाटीलनगर, रंकाळा,

कागल : ०१ कागल,

पन्हाळा : ०२ कोडोली दोन ,

इचलकरंजी : ०१ इचलकरंजी,

आजरा : ०१ अर्दाळ,

गडहिंग्लज: ०१ मुगळी,

हातकणंगले: ०२ नागाव, भादोले,

इतर जिल्हा: ०३ बेडकीहाळ(चिक्कोडी), लोंघे (जळगाव), रामेश्वर(देवगड)

Web Title: The number of coronamuktas increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.