पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 11:41 AM2021-06-03T11:41:36+5:302021-06-03T11:45:02+5:30

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र बुधवारी ...

The number of coronaviruses is higher than that of positive patients | पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

Next
ठळक मुद्देपॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त सलग दिलासा : नवे १५०८ रुग्ण, ३६ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र बुधवारी स्पष्ट झाले. नवे १५०८ रुग्ण नोंदवण्यात आले असून, १७३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ९ जण अन्य जिल्ह्यातील आहेत.

कोल्हापूर शहरात ३६५ रुग्ण आढळले असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात २९१ तर, हातकणंगले तालुक्यात २०१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. करवीर तालुक्यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून, कोल्हापूर शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

इतर जिल्ह्यातील मृत्यू संख्या जास्त

गेल्या २४ तासांत सर्वाधिक ९ मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. तालुकावर मृत्यू संख्या खालीलप्रमाणे

  • करवीर ०८

कणेरीवाडी २, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, वाशी, गाडेगोंडवाडी, वडणगे, उचगाव

  • कोल्हापूर ०७

वरुणतीर्थ वेस, मुक्त सैनिक वसाहत, आर. के. नगर, टाकाळा, जैन गल्ली रविवार पेठ, गजानन नगर २

  • हातकणंगले ०५

हुपरी २, कबनूर, हातकणंगले, पुलाची शिरोली

  • शिरोळ ०२

घोसरवाड, कोंडिग्रे

  • भुदरगड ०१

गारगोटी

  • पन्हाळा ०१

वारणा कोडोली

  • इचलकरंजी ०१

दत्तनगर

  • चंदगड ०१

आमरोळी

  • आजरा ०१

कोळिंद्रे

  • इतर जिल्हे

चिकोडी, कोनूर, मानेनगर सांगली, रत्नागिरी, असरोंडी, मेहबूबनगर आध्र प्रदेश, शेडूर, निमके, उगार खुर्द


तीन तालुक्यांवर लक्ष केंद्रित

कोल्हापूर शहराबरोबरच करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यांवर प्रशासनाने आता लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: The number of coronaviruses is higher than that of positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.