‘जीवनदायी’ रुग्णालयांची संख्या वाढणार

By admin | Published: July 27, 2016 12:12 AM2016-07-27T00:12:36+5:302016-07-27T00:34:44+5:30

राजीव गांधी आरोग्य योजना : लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ : दीडशेहून अधिक रुग्णालयांचे अर्ज

The number of 'life-long' hospitals will increase | ‘जीवनदायी’ रुग्णालयांची संख्या वाढणार

‘जीवनदायी’ रुग्णालयांची संख्या वाढणार

Next

गणेश शिंदे --कोल्हापूर --राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत लाभार्थ्यांची (रुग्ण) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या योजनेत समाविष्ट होण्यासाठी जिल्ह्यातील दीडशेहून अधिक रुग्णालयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी ३४ रुग्णालयांची प्रक्रिया आजअखेर पूर्ण झाली असून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीकडून सात रुग्णालयांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या ३० वरून आणखी वाढणार आहे. रुग्णालयांची संख्या वाढल्याने ठरावीक रुग्णालयांची मक्तेदारी मोडण्यास मदत होणार आहे. राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने प्रथम जुलै २०१२ मध्ये आठ जिल्ह्यांत तर २० नोव्हेंबर २०१३ ला उर्वरित जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास अडीच वर्षांत लाभार्थ्यांची संख्या कमालीची वाढली असून राज्यात पहिल्या तीनमध्ये जिल्ह्याची कामगिरी आहे. यापूर्वी ३२ रुग्णालये या योजनेत समाविष्ट होती.
दोन महिन्यांपूर्वी या योजनेतील करार, अटी व शर्र्थींचा भंग केल्याप्रकरणी दोन रुग्णालयांना ‘बाहेरचा रस्ता’ दाखविण्यात आला. त्यामुळे ती ३० झाली आहे पण, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील दीडशेहून अधिक रुग्णालयांनी योजनेत समाविष्ट होण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यासाठी त्या रुग्णालयाचे दिल्लीतील नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड आॅफ हॉस्पिटल (एनएबीएच) मानांकन असणे गरजेचे आहे. त्यापैकी ३४ रुग्णालयांची प्रक्रिया पूर्ण झाली असून सात रुग्णालयांची तपासणी केली आहे. रुग्णालयांची संख्या वाढल्याने साहजिकच त्याचा फायदा रुग्णांना होणार असल्याने या योजनेत काही ठरावीक रुग्णालयांची असणारी मक्तेदारी मोडण्यास मदत होणार आहे. ‘


अशी राहते प्रक्रिया...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी व एम. डी. इंडियाचे प्रमुख स्वत: रुग्णालयांत जाऊन तपासणी करतात. रुग्णांना ज्या मूलभूत सेवा व सुविधा आहेत. त्या रुग्णालयात प्राप्त आहेत का ? याची खातरजमा करतात. ही समिती याचा अहवाल योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालय सचिव, एम. डी. इंडियाचे अधिकारी व नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एनआयसी)चे प्रतिनिधी यांच्या बैठकीत सादर करतात.


जिल्हालाभार्थी रुग्ण खर्च
१) अहमदनगर१८ हजार ११९५३ कोटी १४ लाख ३९ हजार १७२ रुपये
२) औरंगाबाद२१ हजार ४९०५३ कोटी तीन लाख ५९ हजार ४५० रुपये
३) कोल्हापूर१७ हजार २०२४८ कोटी ७३ लाख २६ हजार ९५ रुपये
४) मुंबई व उपनगर१५ हजार ३३४७ कोटी ६५ लाख ३५ हजार १६० रुपये
५) नाशिक१८ हजार ३७३४६ कोटी ७७ लाख ५७ हजार ८४२ रुपये


या योजनेत सुमारे ११०० आजारांवर मोफत उपचार मिळत असल्याने ही योजना सामान्य माणसाला आधार वाटत आहे. लाभार्थ्यांची संख्या पाहता नवीन रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
-डॉ.अशोक देठे, जिल्हा समन्वयक,
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.

Web Title: The number of 'life-long' hospitals will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.