करवीर, शिरोळ, हातकणंगलेची रुग्णसंख्या वाढतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:05+5:302021-08-13T04:29:05+5:30
कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णसंख्या कमी येत असली तर जिल्ह्यातील करवीर, शिरोळ आणि ...
कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णसंख्या कमी येत असली तर जिल्ह्यातील करवीर, शिरोळ आणि हातकणंगलेची संख्या कमी येत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात नवे ५१४ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून ९ जणांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला आहे.
करवीर तालुक्यात नवीन १००, शिरोळ तालुक्यात ९० तर हातकणंगले तालुक्यात ७० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात ४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात ५०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात नागरीकरण अधिक प्रमाणात आहे. लोकसंख्येची घनता अधिक आहे. करवीर तालुका शहराशेजारी आहे. या तीनही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा होते. परिणामी या ठिकाणी संख्या वाढतीच असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
तालुकावार मृत्यू
कोल्हापूर ०२
शुक्रवार पेठ, ताराबाई पार्क
हातकणंगले ०२
पुलाची शिरोली, अंबप
भुदरगड ०१
नाऱ्याची वाडी
पन्हाळा ०१
कोडोली
शिरोळ ०१
जयसिंगपूर
करवीर ०१
कळंबा
इतर जिल्हा ०१
वडगाव जि. कडेगाव