विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:30+5:302021-04-30T04:28:30+5:30
जयसिंगपूर : शहरात पालिकेकडून विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टिजन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी काही नागरिक अजूनही ...
जयसिंगपूर : शहरात पालिकेकडून विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टिजन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी काही नागरिक अजूनही रस्त्यावर विनाकारण गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.
रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
यड्राव : खोतवाडी ते कोंडीग्रे पाचवा मैलपर्यंतचा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. सांगली नाका ते खोतवाडीपर्यंत व पाचवा मैल ते कोंडीग्रे फाट्यापर्यंत रस्ता करण्यात आला आहे; मात्र खोतवाडी ते कोंडीग्रे पाचवा मैल रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
ॲन्टिजन तपासणी मोहीम राबवा
शिरोळ : शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे पालिकेने ॲन्टिजन तपासणी मोहीम राबविण्याची गरज आहे. जयसिंगपूरप्रमाणे शिरोळ पालिकेनेही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टिजन तपासणी करणे गरजेचे बनले आहे.