नर्सरी, केजीच्या २८ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:37+5:302021-05-26T04:24:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविली जात ...

Nursery, 28,000 KG children at home next year? | नर्सरी, केजीच्या २८ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

नर्सरी, केजीच्या २८ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नर्सरी, ज्युनिअर आणि सिनिअर केजीच्या २८२०० विद्यार्थ्यांचे जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षही घरातच जाणार असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील नर्सरी, केजीच्या मान्यताप्राप्त ३२४ शाळा, तर मान्यता नसलेल्या साधारणत: दोनशे शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थी संख्या २८२०० इतकी आहे. गेल्यावर्षी मार्चपर्यंत या शाळा सुरू होत्या. त्यानंतर कोरोनामुळे पुढील वर्षभर त्या बंद राहिल्या. अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. पण, या लहान विद्यार्थ्यांपर्यंत ते परिणामकारकपणे पोहोचले नाही. त्यामुळे शाळा, वर्ग, शिक्षकांना न पाहताच अधिकतर विद्यार्थी हे पुढील इयत्तेमध्ये प्रवेशित झाले. यावर्षी पुन्हा फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाऊनमुळे शाळा प्रवेशाचा गुढीपाडव्याचा मुहूर्त ७० टक्के पालकांनी ऑनलाईन साधला आहे. आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास ते उत्सुक आहेत. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांबाबत संसर्गाच्या व्यक्त केलेल्या शक्यतेने त्यांच्यामध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षातही नर्सरी, केजीतील मुलांना शाळेचे दर्शन होणे कठीणच वाटते.

जिल्ह्यातील नर्सरी टू केजीच्या शाळा (मान्यताप्राप्त)

वर्ष शाळा विद्यार्थीसंख्या

२०१८-१९ २५० २६०००

२०१९-२० ३२४ २८२००

२०२०-२१ ३२४ २८२००

वर्षभर कुलूप; यंदा?

यावर्षी जुलैमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यात मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला आणि पालकांच्या मनातील भीती गेली, तरच या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश होईल.

- के. डी. पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,

राज्य इंग्लिश मेडियम स्कूल ट्रस्टीज असोसिएशन.

सध्या प्रादुर्भाव वाढताना या मुलांच्या शाळा सुरू करणे सोपे नाही. वय लहान असल्याने ऑनलाईन शिक्षण त्यांच्यापर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नाही. त्यामुळे यावर्षी शाळा बंद राहण्याचीच शक्यता आहे. ते लक्षात घेऊन या शाळा टिकविण्यासाठी शासनाने त्यांना आरटीईचे पैसे लवकर द्यावेत.

- मोहन माने, संस्थापक, ब्रिलियंट इंग्लिश मेडियम स्कूल, शिरोळ.

या मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. कोरोना वाढताना त्यांना शाळेत पाठविण्याचे पालक, तर शाळा सुरू करण्याचे धाडस संस्थाचालक करणार नाहीत. किमान डिसेंबरपर्यंत विद्यार्थी घरात राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील या शाळांमध्ये सुमारे पाच हजार शिक्षक, कर्मचारी आहेत. त्यांना शासनाने अनुदान देणे आवश्यक आहे.

- डॉ. संदेश कचरे, अध्यक्ष, मॉडर्न शिक्षण संस्था, कोल्हापूर.

पालकही परेशान

गेल्यावर्षी प्ले ग्रुपमध्ये असणाऱ्या माझ्या मुलीला कोरोनामुळे शाळेत जाता आले नाही. यावर्षी कोरोना वाढत आहे. त्यामुळे शाळा सुरू होणार नसल्याचे दिसते. मुलीच्या शिक्षणाची चिंता वाटत आहे.

-अश्विनी पडवळे, दत्त कॉलनी, कणेरी.

विद्यार्थीहित लक्षात घेता शाळा सुरू झाली पाहिजे असे वाटते. मात्र, या लहान मुलांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात.

- अमित पाटील, राजेंद्रनगर.

गेल्यावर्षी मुलाचे ज्युनिअर केजीमध्ये ॲडमिशन केले. पण, कोरोनामुळे त्याला शाळेत जाता आले नाही. आताही कोरोना असल्याने त्याला शाळेत पाठविण्याची भीती वाटते. पुढील वर्गात प्रवेश घ्यायचा की नाही, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.

- सुहासिनी देसाई, टाकाळा.

मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम

कोरोनामुळे मुलांचे मैदानावरील खेळणे थांबून स्क्रीनटाईम वाढला आहे. त्याचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. पालकांनी त्यांचा टेरेसवर व्यायाम घ्यावा. त्यांचे वाचन, लेखन करून घ्यावे. त्यांच्यावर वारंवार टीका करू नये. त्यांच्या शंकांचे निरसन करावे. पोषक आहार त्यांना द्यावा, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निखिल चौगुले यांनी सांगितले.

===Photopath===

250521\25kol_1_25052021_5.jpg

===Caption===

डमी (२५०५२०२१-कोल-स्टार ७४७ डमी)

Web Title: Nursery, 28,000 KG children at home next year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.