‘न्यूट्रीयंटस’ वाद : जिल्हा बॅँकेला म्हणणे सादर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 03:52 PM2019-01-22T15:52:14+5:302019-01-22T15:53:52+5:30
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ताब्याबाबत न्यूट्रीयंटस कंपनीने दाखल केलेल्या जिल्हा न्यायालयातील याचिकेवर सुनावणी झाली. कारखान्याचा ताबा घेतल्याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा बॅँकेला दिले आहेत.
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ताब्याबाबत न्यूट्रीयंटस कंपनीने दाखल केलेल्या जिल्हा न्यायालयातील याचिकेवर सुनावणी झाली. कारखान्याचा ताबा घेतल्याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा बॅँकेला दिले आहेत.
‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने करारानुसार मार्च २०१८ मध्ये हप्ता न भरल्याने बॅँकेने करार रद्द करीत कारखान्याचा ताबा घेतला आहे. याविरोधात कंपनीने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये बॅँकेने घेतलेला ताबा बेकायदेशीर असल्याचे म्हणणे कंपनीने मांडले आहे. यावर सुनावणी झाली.
कंपनीने केलेल्या तक्रारीबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबत गुरुवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा बॅँकेकडून अॅड. लुईस शहा, तर कंपनीकडून अॅड. अभिजित कापसे यांनी काम पाहिले.
‘न्यूट्रीयंटस’ व जिल्हा बॅँकेतील वाद मिटविण्यासाठी लवादाची नेमणूक करावी, अशी मागणी ‘न्यूट्रीयंटस’ ने यापूर्वीच उच्च न्यायालयात केली आहे. याबाबतची सुनावणी शुक्रवारी (दि. २५) होणार आहे.