बेळगाव मनपा निवडणुकीवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:30+5:302021-09-08T04:30:30+5:30
पराभूत उमेदवार यांच्या तक्रारी हेल्प डेस्कच्या माध्यमातून एकत्रित केल्या जाणार आहेत. यानंतर न्यायालयात धाव घेतली जाणार आहे. मंगळवारी महानगरपालिका ...
पराभूत उमेदवार यांच्या तक्रारी हेल्प डेस्कच्या माध्यमातून एकत्रित केल्या जाणार आहेत. यानंतर न्यायालयात धाव घेतली जाणार आहे.
मंगळवारी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानंतर अनेकांना धक्का बसला आहे. अनपेक्षित असा विचित्र निकाल बाहेर पडला. यामुळे पराभूत उमेदवार एकत्र आले. त्यांनी मंगळवारी रात्रीच जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसून रद्द करा अशी मागणी केली. मात्र, यासंदर्भात ठोस काही कळले नाही. बुधवारी एकत्रित बैठक घेऊन या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेवर आवाज उठवण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच बेळगावात घडत असेल. त्या संदर्भात न्यायालयीन लढा कसा होणार? यावर पुढील स्वरूप ठरणार आहे. मंगळवारी मराठा मंदिरात बैठक झाली अपक्ष, समिती आणि आपसह शेकडो उमेदवार या बैठकीला उपस्थित होते.
व्हीव्ही पॅट शिवाय मतदान घेणे, एव्हीएम मशीनचा डेमो न घेणे अशा तक्रारीं उमेदवारांनी केल्या, त्यावर मराठा मंदिरात डेस्क उभारून तक्रार अर्ज घेतले जाणार असून, त्यानंतर न्यायालयात धाव घेतली जाणार आहे.