नागदेववाडी सरपंच आरक्षणास हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:36+5:302021-02-10T04:24:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीचे आरक्षण सलग वीस वर्षे खुले कसे राहिले? अशी तक्रार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीचे आरक्षण सलग वीस वर्षे खुले कसे राहिले? अशी तक्रार अभिजित निगडे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावर मंगळवारी सुनावणी झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे.
नागदेववाडी ग्रामपंचायत निवडणुकीत तेरापैकी एक जागा बिनविरोध झाल्याने बारा जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर काढलेल्या सरपंच आरक्षणात खुले राहिले. खुले झाल्याने अनेकांनी तयारी सुरू केली होती, तोपर्यंत अभिजित निगडे यांनी आरक्षणावर हरकत घेतले. सलग वीस वर्षे खुल्या प्रवर्गासाठीच राखीव असल्याने येथे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
असे राहिले सरपंच पदाचे आरक्षण :
साल आरक्षण
१९९५-२००० सर्वसाधारण महिला
२०००-२००५ नागरिकांचा मागास प्रवर्ग
२००५-२०१० सर्वसाधारण
२०१०-२०१५ सर्वसाधारण
२०१५-२०२० सर्वसाधारण महिला
२०२०- २०२५ सर्वसाधारण
कोट- नागदेववाडीसाठी काढलेले आरक्षण चुकीचे आहे. ते इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण होणे अपेक्षित होते. याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.
- विश्वास निगडे (माजी सरपंच)