कोल्हापुरात कॅफेत सुरू होते अश्लील चाळे, निर्भया पथकाची कारवाई; पालकांना बोलावून दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:11 PM2023-08-05T12:11:00+5:302023-08-05T12:16:13+5:30

पाच मुले, चार मुली आढळल्या, पालकांना बोलावून दिली समज

Obscene chale starts in cafe in Kolhapur, action of Nirbhaya team | कोल्हापुरात कॅफेत सुरू होते अश्लील चाळे, निर्भया पथकाची कारवाई; पालकांना बोलावून दिली समज

कोल्हापुरात कॅफेत सुरू होते अश्लील चाळे, निर्भया पथकाची कारवाई; पालकांना बोलावून दिली समज

googlenewsNext

कोल्हापूर : निर्भया पथकाने शुक्रवारी मोठ्या फौजफाट्यासह अंधाऱ्या खोलीत अश्लील चाळे करणाऱ्यांवर थेट कारवाईस सुरुवात केली. यात शहरातील उमा टाॅकीज परिसरातील कॅफेत चार मुली आणि पाच मुले आढळून आली. त्यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून, कॅफे चालकावरही कारवाई करण्यात आली.

पाच दिवसांपूर्वी खासबाग परिसरातील बस स्टाॅपजवळ उभ्या असलेल्या विद्यार्थिंनीची छेडछाड काढणाऱ्या तरुणांना नागरिकांनी चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. याची अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी गांभीर्याने नोंद घेतली. असे प्रकार घडल्यानंतर थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

दरम्यान, शहरातील कॅफेंचीही निर्भया पथकाने तपासणी केली. यात उमा टाॅकीज परिसरातील एका कॅफेची तपासणी केली असता त्यात चार मुली, पाच मुलांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या सर्वांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांच्यासमोर कडक समज देण्यात आली. तर कॅफे चालकाचा परवाना रद्द करण्यासाठी महापालिकेकडे पत्र पाठविण्यात आले आहे.

शाळा, महाविद्यालयांना सूचना

शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी तक्रारपेट्या असाव्यात, तक्रारींची वेळीच दखल घ्यावी, ओळखपत्राशिवाय इतरांना कॉलेजच्या आवारात प्रवेश देऊ नये, हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना वेळीच समज द्यावी, विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, छेडछाडीबद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यास त्यांच्या पालकांना बोलावून समज द्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, अशा सूचना पोलिसांनी शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत.

Web Title: Obscene chale starts in cafe in Kolhapur, action of Nirbhaya team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.