‘थेटपाईपलाईन’च्या मार्गात अडथळेच-: बिल थकविल्याने ठेकेदाराची पाठ; वाढीव मुदत संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:42 AM2019-11-02T00:42:20+5:302019-11-02T00:44:16+5:30

कोल्हापूरकरांच्या ३० वर्षांच्या आंदोलनानंतर काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला. सव्वा दोन वर्षांत पूर्ण होणारे काम पाच वर्ष होत आले तरी रखडलेलेच आहे. ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे

 Obstacles in the way of the 'direct pipeline' | ‘थेटपाईपलाईन’च्या मार्गात अडथळेच-: बिल थकविल्याने ठेकेदाराची पाठ; वाढीव मुदत संपण्याच्या मार्गावर

‘थेटपाईपलाईन’च्या मार्गात अडथळेच-: बिल थकविल्याने ठेकेदाराची पाठ; वाढीव मुदत संपण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्दे धरण भरल्याने जॅकवेलचे काम थांबले

विनोद सावंत ।
कोल्हापूर : काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेतील कामात अनेक अडथळ्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. बिल थकल्यामुळे ठेकेदाराने कामाकडे पाठ फिरविली आहे. पावसामुळे धरणक्षेत्रातील जॅकवेल पाण्यात बुडाली आहे. तर पाईपलाईन टाकण्यास अद्यापही काही गावांमध्ये विरोध कायम आहे. अशा प्रतिकूल परिस्थतीत थेट पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन कोल्हापूरकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोल्हापूरकरांच्या ३० वर्षांच्या आंदोलनानंतर काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला. आमदार सतेज पाटील यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला. काँगे्रस-राष्ट्रवादीची केंद्रात सत्ता असताना कामाला मुहूर्त मिळाला. सव्वा दोन वर्षांत पूर्ण होणारे काम पाच वर्ष होत आले तरी रखडलेलेच आहे. ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. सध्या ठेकेदाराला दिवसा ५0 हजार रुपयांप्रमाणे दंड सुरू आहे. दुसऱ्यांंदा वाढीव दिलेली मुदत पुढील महिन्यात संपत आहे; परंतु अद्यापही काम अपूर्णच आहे.

विधानसभेत थेटपाईपलाईनचा मुद्दा गाजला
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत थेटपाईपलाईनचा मुद्दा चांगलाच गाजला. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काम रखडल्यावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली. आमच्या नातवाला तरी थेटपाईपलाईनचे पाणी मिळेल काय, असा टोलाही त्यांनी लगावला. यावर आमदार पाटील यांनी सहा महिन्यांत काम पूर्ण होईल आणि नातवाला नव्हे तर तुम्हालाच पाणी पाजू, असा पलटवार केला. यामुळे थेटपाईपलाईन पुन्हा चर्चेत आली.

बिल थकल्यामुळे नव्हे, तर दिवाळी सुट्टी आणि पावसामुळे काम थांबले आहे. ठेकेदाराने जीएसटी, तसेच खंड ३८ नुसार भविष्यात होणाºया कामांसाठी २८ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. निविदेतील तरतुदीनुसार ठेकेदाराला चार दिवसांमध्ये बिल दिले जाईल. त्यामुळे काम थांबणार नाही. जॅकवेलचे काम मे २0२0 अखेर पूर्ण होईल. ५२ किलोमीटर पैकी केवळ ५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे बाकी आहे. ही सर्व कामे पुढील वर्षाअखेरीस पूर्ण होऊन कोल्हापूरकरांना थेटपाईपलाईनने पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
- सुरेश कुलकर्णी, मनपा जलअभियंता

‘पाटबंधारे’च्या निर्णयावर थेट पाईपलाईनचे भवितव्य
यंदा मुसळधार झालेल्या पवासामुळे काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परतीच्या पावसामुळेही धरणाची पातळी कायम आहे. त्यामुळे जॅकवेल पाण्यामध्ये आहे. धरणाची पातळी कमी झाल्याशिवाय येथील कामाला सुरुवात करता येत नाही. या वर्षी येथील कामाला अवधी कमी मिळणार आहे. त्यामुळे राधानगरी धरणाऐवजी काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास प्राधान्य द्यावे, अशा विनंतीचे पत्र महापालिकेने पाटबंधारे विभागाला दिले आहे. २0२0 मध्येही शहराला थेटपाईपलाईने पाणीपुरवठा होईल, याची शाश्वती नाही.

रखडलेली
कामे
धरण क्षेत्रातील जॅकवेल. सोळांकू र, नरतवडे, कपिलेश्वर येथील ५ कि.मी. अंतराची पाईपलाईन. पुईखडीतील जलशुद्धीकरणात सप्लाय पाईपलाईन.

Web Title:  Obstacles in the way of the 'direct pipeline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.