‘सिग्नल’ला बसथांब्यांचा अडथळा

By admin | Published: May 20, 2017 12:33 AM2017-05-20T00:33:55+5:302017-05-20T00:33:55+5:30

वाहतूक कोंडी : शहरातील सात ठिकाणचे बसथांबे अन्यत्र हलविण्याची गरज

The obstruction of the signal to the signal | ‘सिग्नल’ला बसथांब्यांचा अडथळा

‘सिग्नल’ला बसथांब्यांचा अडथळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विस्कळीत वाहतूक व्यवस्था, अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यात परत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांची संख्या जास्त आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील बंद असलेले काही सिग्नल सुरू करण्यात आले. मात्र, यापैकी काही सिग्नलजवळच बसथांबे असल्याने हेच बसथांबे आता वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहरातील अनेक वर्षे बंद असलेले काही सिग्नल पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीस काही प्रमाणात शिस्त लागत आहेत. मात्र, काही सिग्नलजवळच के.एम.टी., एस.टी.चे बसथांबे आहेत. या ठिकाणी एकाच वेळी एस.टी., के.एम.टी. व रिक्षा थांबत असल्याने सिग्नल सुटल्यानंतर वाहतुकीची कोंडी होत आहे. या बसथांब्यांजवळ आजूबाजूलाच प्रवासी व रिक्षांची गर्दी होते. काहीवेळाला रस्त्याच्या मध्यभागीच के.एम.टी. व एस. टी. थांबत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होतो. या प्रकारामुळे वाहनधारक व एस.टी., केएमटी, रिक्षाचालकांच्यात नेहमीच वाद होत आहेत. बसथांबे सिग्नलपासून काही अंतर पुढे किंवा मागे हलवावेत, अशी वाहनधारकांमधून मागणी होत आहे.


वादाचे प्रसंग...
सिग्नलजवळ असलेल्या बसथांब्यांवर के.एम.टी., एस.टी., रिक्षा हे प्रवासी घेण्यासाठी थांबतात. मात्र, त्याचवेळी सिग्नल सुटल्याने प्रत्येक वाहनधारकांना पुढे जाण्याची गडबड असते. त्यामुळे हे बसथांबे आता वाहतुकीस अडथळा बनताहेत. त्यामध्ये दुसऱ्या बाजूचा सिग्नल सुटल्याने पुन्हा वाहतुकीची मोठी कोंडी होते. अनेकवेळा त्यामुळे वाहनधारकांमध्ये वाद होतात. तसेच प्रवासी के.एम.टी. किंवा एस.टी. बस पकडण्यासाठी गाडीमागे धावत असतात. यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे.


सिग्नलजवळ वाहतुकीस अडथळे होणारे के.एम.टी. व एस.टी.चे बसथांबे अन्यत्र स्थलांतरित करावे, असे पत्र वाहतूक शाखेच्यावतीने संबंधित विभागास दिले आहे. यासह काही ठिकाणी बसथांबे स्थलांतरित करणे शक्य नाही. त्या ठिकाणी एका बाजूला बस, के.एम.टी. थांबवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.
- अशोक धुमाळ, वाहतूक पोलीस निरीक्षक



येथील बसथांबे हलविण्याची गरजशहरातील माळकर तिकटी, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, सायबर चौक, माऊली चौकजवळील सिग्नलजवळच के.एम.टी. बसथांबे आहेत. या ठिकाणी के.एम.टी.सह रिक्षा नेहमी लागलेल्या असतात. यासह टाऊन हॉल बागव लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथे एस.टी. बसेस थांबतात. या ठिकाणी असणारे प्रवासी थांबे हलविण्याची गरज आहे.

Web Title: The obstruction of the signal to the signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.