ऑक्टनाईन फसवणूक: संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले मोकाटच, मालमत्ता जप्तीची गुंतवणूकदारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:53 PM2022-12-10T13:53:38+5:302022-12-10T13:54:06+5:30

संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले कोल्हापुरातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडे ड्रायव्हर म्हणूनच नोकरीस होता.

Octane Scam: Suspected mastermind Krishnat Chaugle absconding | ऑक्टनाईन फसवणूक: संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले मोकाटच, मालमत्ता जप्तीची गुंतवणूकदारांची मागणी

ऑक्टनाईन फसवणूक: संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले मोकाटच, मालमत्ता जप्तीची गुंतवणूकदारांची मागणी

googlenewsNext

कोल्हापूर : ऑक्टनाईन आर्थिक फसवणुकीतील कंपनीचा चॅनेल पार्टनर असलेल्या मास्टर माईंड कृष्णात नंदा चौगले (रा. २४८० बी वॉर्ड मंगळवार पेठ कोल्हापूर) हा मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो केरळला सासरवाडीत असल्याची माहिती पोलिसांपर्यंत गेली आहे. त्याच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.

कृष्णात चौगले साधा ड्रायव्हर आहे. त्याच्या दोन रुग्णवाहिका आहेत. कोल्हापुरातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडे तो ड्रायव्हर म्हणूनच नोकरीस होता. त्यांने ए. एस. ट्रेडर्समध्ये गुंतवणूक केली होती. त्याचे परतावे त्याला मिळत होते. त्याच माध्यमातून त्याचा अभिजित नागांवकर याच्याशी संपर्क आला. नागांवकर अगोदर ए. एस. ट्रेडर्समध्ये नोकरीस होता. चौगले यानेच त्याला तू तेथून बाहेर पडून नवीन कंपनी काढ, मी तुला चांगली गुंतवणूक मिळवून देतो, अशी हमी दिली. 

त्यानुसार नागांवकर याने नव्याने कंपनी स्थापन केली. चौगले त्याला गुंतवणूक मिळवून देत होता.. त्यातील त्याला वेगळे दोन टक्के कमिशन मिळत होते. त्यातून त्याने तो जिथे नोकरीस होता तेथील डॉक्टरांनाही गुंतवणूक करण्यास भरीस घातले व त्यावेळी परतावे मिळत असल्याने प्रत्येकानेच गुंतवणूक केल्याचे आता स्पष्ट होत आहे. 

चौगले याने उजळाईवाडी (ता. करवीर) येथे सात गुंठ्यांचा भूखंड घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्याशिवाय सीमाभागात व आंबा रोडवरही काही एकर जमीन घेतल्याची माहिती पोलिसांपर्यंत आली आहे. त्याच्या डी मॅट खात्यावर काही महिन्यापूर्वी किमान ३५ लाख रुपयांचे शेअर्स ट्रेडिंगचे व्यवहार झाल्याचेही पुढे आले आहे. त्याची सासरवाडी केरळला असल्याने अटक चुकवण्यासाठी तिकडे गेला असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Web Title: Octane Scam: Suspected mastermind Krishnat Chaugle absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.