Kolhapur Politics: शाहू छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह मेसेज, सतेज पाटील यांची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:08 PM2024-04-02T12:08:55+5:302024-04-02T12:09:52+5:30

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्याबद्दल अज्ञातांनी सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केले आहेत. बदनामी ...

Offensive messages about Shahu Chhatrapati, MLA Satej Patil police complaint | Kolhapur Politics: शाहू छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह मेसेज, सतेज पाटील यांची पोलिसात तक्रार

Kolhapur Politics: शाहू छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह मेसेज, सतेज पाटील यांची पोलिसात तक्रार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्याबद्दल अज्ञातांनी सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केले आहेत. बदनामी आणि तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल करणाऱ्या संशयितांना पकडून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी अर्जाद्वारे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केली.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागताच काही समाजकंटकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेखन करून ते मेसेज सोशल मीडियात व्हायरल केले आहेत. याबद्दल माहिती देताना आमदार पाटील म्हणाले, ‘या निवडणुकीत वैयक्तिक टीका दोन्हीकडून होणे अपेक्षित नाही. वैयक्तिक टीका करू नका, अशा सूचना आम्ही आमच्या पातळीवर नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावे यासाठी लोक उत्सुक आहेत. त्यांच्या संदर्भात चुकीचे मेसेज तिकडून येण्यास सुरुवात झाली. यामुळे मी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.’

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

निवडणूक काळात जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारे, राजकीय पक्ष आणि उमेदवारांची बदनामी करणारे, दिशाभूल करणारे मेसेज तयार करणारे आणि व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सायबर पोलिसांची सोशल मीडियावर नजर आहे. आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करू नयेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करू, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.

Web Title: Offensive messages about Shahu Chhatrapati, MLA Satej Patil police complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.